श्री महालक्ष्मी मंदिरात अधिक मासानिमित्त महिनाभर धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम*कमल पुष्प अर्चना आणि विष्णू यागाने उत्साहात प्रारंभ
*श्री महालक्ष्मी मंदिरात अधिक मासानिमित्त महिनाभर धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम*
कमल पुष्प अर्चना आणि विष्णू यागाने उत्साहात प्रारंभ
पुणे : श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागतर्फे अधिक मास निमित्त महिनाभर विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, दि. १५ जून पर्यंत दररोज सायंकाळी ५ नंतर मंदिरामध्ये हे उपक्रम होणार असून कमल पुष्प अर्चना आणि विष्णू यागाने नुकताच कार्यक्रमांना उत्साहात प्रारंभ झाला, अशी माहिती ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल यांनी दिली.
ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल यांसह प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल व डॉ. तृप्ती अग्रवाल यांनी उपक्रमांचे संयोजन केले आहे. उपक्रमांमध्ये डॉ.भावार्थ देखणे यांचे प्रवचन, मीनू पोतदार यांचे सुंदरकांड सादरीकरण, राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.डॉ.चारुदत्त आफळे यांचे कीर्तन यांसह श्री सूक्त हवन, सुवर्ण कमल रजत कमल अर्चना, सहस्त्र बेल पत्र अर्चना, तुळशी अर्चना, पुष्प अर्चना, दीप उत्सव असे धार्मिक कार्यक्रम होतील.
याशिवाय संतोषी मुंदडा व ग्रुपचे भजन, प्रिया डिसा व ग्रुपचा गरबा, गीता परिवार तर्फे विष्णू सहस्त्रनाम सामूहिक पठण व आरती, ओम नमो भगवते वासुदेवाय नम: चे सामूहिक पठण, श्री सूक्त सामूहिक पठण, होम पूर्णाहुती असे कार्यक्रम देखील होणार आहेत. सामाजिक उपक्रमांमध्ये पुस्तक तुला, गो माता अन्नकोट, झुला उत्सव, धान्य तुला दान याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी देवी भक्तांनी मोठया संख्येने यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment