एचपीसीएल आणि टाटा मोटर्स यांनी वापरलेल्या वाहन-स्नेहकांसाठी विस्तारक्षम 'चक्रीय अर्थव्यवस्था मॉडेल' विकसित करण्यासाठी भागीदारी केली


 
एचपीसीएल आणि टाटा मोटर्स यांनी वापरलेल्या वाहन-स्नेहकांसाठी विस्तारक्षम 'चक्रीय अर्थव्यवस्था मॉडेल' विकसित करण्यासाठी भागीदारी केली

मुंबई, २६ मे २०२६: हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) ही महारत्‍न ऑइल मार्केटिंग कंपनी आणि भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्स यांनी सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी केली आहे. या करारांतर्गत वापरलेल्या ऑटोमोटिव्ह लुब्रिकंट्सचे जबाबदारीने संकलन व पुनर्वापर करण्यासाठी पद्धतशीर आणि स्केलेबल मॉडेलचा पायलट प्रकल्प सुरू करण्‍यात येणार आहे.

हा सहयोग भारतातील दोन आघाडीच्या कंपन्‍यांच्‍या पूरक बलस्थानांना एकत्र आणतो, ज्‍यामुळे एका महत्त्वपूर्ण शाश्वतता आव्हानाचा सामना करता येईल. तसेच, यामुळे भारताच्या विकसित होत असलेल्या एक्सटेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी (ईपीआर) फ्रेमवर्कच्या अनुपालनाला पाठबळ मिळेल आणि देशाच्या चक्रिय अर्थव्‍यस्‍थेच्‍या उद्दिष्टांना गती दिली जाईल.

या उपक्रमाचा वापरलेल्या लुब्रिकंट्सच्या व्यवस्थापनासाठी एक संघटित आणि ट्रॅक करण्यायोग्य यंत्रणा स्थापित करण्‍याचा मनसुबा आहे, ज्याचे वर्गीकरण घातक कचरा म्हणून केले जाते, ज्यामध्ये संकलन आणि साठवणुकीपासून ते पुनर्वापरापर्यंतच्या प्रक्रियेचा समावेश आहे. ही प्रक्रिया वापरलेल्या तेलाचे उच्च दर्जाच्या री-रिफाइंड बेस ऑइलमध्ये रूपांतर करण्यास सक्षम करेल, ज्यामुळे संसाधनांची कार्यक्षमता सुधारेल आणि पर्यावरणीय धोका कमी होईल. या पायलट प्रकल्पाद्वारे जबाबदार कचरा व्यवस्थापनाचे नवीन निकष प्रस्थापित होण्याची आणि भारताला चक्रिय, संसाधन-कार्यक्षम अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करण्यास मदत मिळण्याची अपेक्षा आहे.

या पायलट प्रकल्पाच्या लाँचप्रसंगी मत व्‍यक्त करत एचपीसीएलचे लुब्‍सचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्री. सीएच श्रीनिवास म्हणाले, “वापरलेल्या तेलामध्ये खरी चक्रीयता साधण्याची सुरुवात, पुनर्शुद्ध केलेल्या बेस ऑइलला तयार वंगणांमध्ये पुन्हा समाविष्ट करण्यापासून होते. वापरलेल्या तेलाच्या चक्रीयतेसाठी एक विस्तारक्षम मॉडेल तयार करण्याच्या आणि संपूर्ण कामकाजातील कार्बन फूटप्रिंट कमी करण्याच्या दिशेने, टाटा मोटर्ससोबतचे आमचे सहकार्य हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.”

या सहयोगाबाबत मत व्‍यक्त करत टाटा मोटर्स लिमिटेडच्‍या पार्ट्स अँड सर्व्हिसेसचे प्रमुख श्री. विक्रम अग्रवाल म्हणाले, “वापरलेले ऑटोमोटिव्ह लुब्रिकंट जबाबदारीने हाताळले गेले नाही, तर त्यामुळे पर्यावरणाचे दीर्घकालीन नुकसान होऊ शकते. या आव्हानाचा सामना करण्यासाठी विश्वासार्ह भागीदार, स्पष्ट प्रक्रिया आणि मोठ्या प्रमाणावर काम करण्याची क्षमता आवश्यक आहे. एचपीसीएल विविध आघाड्यांवर टाटा मोटर्सचे एक विश्वासू भागीदार राहिले आहे आणि हा सहयोग आम्हाला संघटित व जबाबदार पुनर्वापराच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकण्यास मदत करेल. दोन्ही कंपन्‍यांच्‍या एकत्रित ताकदीमुळे आम्हाला विश्वास आहे की, हा पायलट प्रकल्प संपूर्ण उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर स्वीकारला जाण्यासाठी मजबूत पाया तयार करू शकेल.”

या सहयोगांतर्गत एचपीसीएल अधिकृत संकलन यंत्रणेच्या माध्यमातून वापरलेल्या लुब्रिकंट्सचे एकत्रीकरण आणि वाहतूक करेल, ज्यामुळे ते नोंदणीकृत रिसायकलर्सपर्यंत पोहोचवणे सुनिश्चित होईल. टाटा मोटर्स आपल्या व्यापक अधिकृत सेवा नेटवर्कचा वापर करून पद्धतशीर संकलन सक्षम करेल आणि आपल्या संपूर्ण परिसंस्‍थेमध्ये कचऱ्याची जबाबदार विल्हेवाट लावण्याच्या पद्धतींना चालना देईल.

हा पायलट प्रकल्प निवडक राज्यांमध्ये लागू केला जाईल आणि दोन्ही कंपन्‍यांच्‍या प्रतिनिधींचा समावेश असलेल्या संयुक्त समितीद्वारे त्याचे संचलन केले जाईल. ही समिती प्रगतीचे निरीक्षण करण्यासाठी आणि व्याप्ती वाढवण्याच्या क्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी जबाबदार असेल.

सर्वांगीण मोबिलिटी सोल्यूशन्स प्रदाता म्हणून टाटा मोटर्स आपल्या व्यावसायिक वाहनांच्या पोर्टफोलिओला संपूर्ण सेवा २.० सह एकत्र करते, ज्याद्वारे निश्चित टर्नअराउंड वेळ, वार्षिक देखभाल कंत्राट आणि मूळ स्पेअर पार्ट्सची उपलब्धता यांसह एंड-टू-एंड लाइफसायकल सोल्यूशन्स प्रदान केले जातात. या सेवांना टाटा मोटर्सच्या फ्लीट एज या कनेक्टेड वेईकल प्लॅटफॉर्ममुळे अधिक पाठबळ मिळते, जे डेटा-आधारित फ्लीट ऑप्टिमायझेशन आणि वाहनांचा अपटाइम सुधारण्यास सक्षम करते. टाटा मोटर्सचे संपूर्ण भारतात ४,५०० हून अधिक विक्री आणि सेवा केंद्रांचे नेटवर्क कार्यरत आहे.



Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश