टोटल स्पोर्ट्स अँड फिटनेसच्या पुण्यात फ्लॅगशिप स्टोअरला प्रारंभ वाढत्या क्रीडा व फिटनेस मागणीवर भर

टोटल स्पोर्ट्स अँड फिटनेसच्या पुण्यात फ्लॅगशिप स्टोअरला प्रारंभ 
वाढत्या क्रीडा व फिटनेस मागणीवर भर
पुणे, २ मे २०२६: टोटल स्पोर्ट्स ॲन्ड फिटनेस या ख्यातनाम आघाडीच्या मल्टी-ब्रँड स्पोर्ट्स आणि फिटनेस रिटेल चेनने पुण्यात आपले फ्लॅगशिप स्टोअर सुरू केले आहे. देशात वेगाने वाढत असलेल्या क्रीडा, फिटनेस आणि लाइफस्टाइल मार्केटमध्ये विस्तार करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. हे स्टोअर पिंपरी चिंचवडमधील भूमकर चौक, रायझ अल्टा प्राइम प्लाझा येथे सुरू करण्यात आले आहे. क्रीडाप्रेमी, फिटनेस करणारे आणि सक्रिय जीवनशैली जगणाऱ्या लोकांसाठी हे एक सोयीचे आणि सर्व सुविधा असलेले ठिकाण ठरणार आहे.

सुमारे पाच हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या या स्टोअरमध्ये शंभर पेक्षा जास्त ब्रँड्सची पाच हजारहून अधिक उत्पादने उपलब्ध आहेत. नवशिक्या व्यक्तींपासून ते व्यावसायिक खेळाडूंपर्यंत प्रत्येकासाठी येथे योग्य पर्याय आहेत. क्रीडा साहित्य, फिटनेस उपकरणे आणि अ‍ॅक्टिव्ह लाइफस्टाइलशी संबंधित अनेक प्रकारची उत्पादने एकाच छताखाली मिळतात.

सन २००३ पासून काम करत असलेल्या या ब्रँडवर आजपर्यंत सहा लाखांहून अधिक ग्राहकांचा विश्वास आहे. ग्राहकांना योग्य मार्गदर्शन, प्रॉडक्टची माहिती आणि वैयक्तिक मदत देऊन चांगला खरेदी अनुभव देण्यावर कंपनीचा भर आहे. पुण्यातील हे स्टोअरही त्याच विचाराने तयार करण्यात आले आहे. येथे प्रशिक्षित टीम ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार योग्य वस्तू निवडायला मदत करते.

 कंपनीचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक नीतिन म्हणाले,
“भारतामध्ये फिटनेसबाबत जागरूकता वाढत आहे आणि लोक आता प्रत्यक्ष कृतीकडे वळत आहेत. लोकांना चांगल्या दर्जाची उत्पादने, योग्य मार्गदर्शन आणि चांगला अनुभव हवा आहे. पुण्यातील आमचे हे स्टोअर याच गरजा लक्षात घेऊन सुरू केले आहे.”

ते पुढे म्हणाले, सध्या भारतात क्रीडा आणि फिटनेस बाजार झपाट्याने वाढत आहे. २०२५ मध्ये सुमारे २.५ अब्ज डॉलर असलेला हा बाजार २०३४ पर्यंत ४ अब्ज डॉलरपेक्षा जास्त होण्याचा अंदाज आहे. तसेच सुमारे १६,२०० कोटी रुपयांचा फिटनेस उद्योग २०३० पर्यंत दुप्पट होण्याची शक्यता आहे. वाढती आरोग्य जागरूकता, शहरीकरण आणि वाढते उत्पन्न ही या वाढीची प्रमुख कारणे आहेत. तरीही, अजूनही फार कमी लोक नियमितपणे फिटनेसशी जोडलेले आहेत. त्यामुळे या क्षेत्रात वाढीसाठी मोठी संधी आहे. टोटल स्पोर्ट्स अँड फिटनेस केवळ विक्रीवर लक्ष न देता ग्राहकांना चांगला अनुभव देण्यावर भर देत आहे.

पुण्याची निवड फ्लॅगशिप मार्केट म्हणून करण्यात आली कारण हे शहर फिटनेससाठी वेगाने पुढे येत आहे. येथे तरुण, विद्यार्थी आणि आरोग्याबाबत जागरूक लोक मोठ्या संख्येने आहेत. रनिंग, सायकलिंग, जिम आणि इतर क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग वाढत आहे. त्यामुळे पुण्यात फिटनेस ही आता जीवनशैली बनत आहे. पश्चिम भारतातील ग्राहक खर्चही या क्षेत्रात मोठा वाटा उचलतो, त्यामुळे पुणे हे महत्त्वाचे बाजारपेठ ठरत आहे.

“हे स्टोअर फक्त खरेदीसाठी नाही, तर एक अनुभव देणारे ठिकाण आहे. आजचे ग्राहक वैयक्तिक आणि वेगळा अनुभव शोधतात. आम्ही त्यांना योग्य पर्याय निवडायला मदत करू, तसेच पुण्यातील क्रीडा आणि फिटनेस समुदायाशी जोडले जाऊ.” असेही शाह यांनी सांगितले. 

भारतामध्ये फिटनेस क्षेत्र सातत्याने वाढत आहे—जिम, होम फिटनेस, क्रीडा उपक्रम आणि वेलनेस या सर्व क्षेत्रांमध्ये वाढ दिसत आहे. या पार्श्वभूमीवर, पुण्यातील या नवीन स्टोअरमुळे टोटल स्पोर्ट्स अँड फिटनेस आपली उपस्थिती अधिक मजबूत करत आहे.

टोटल स्पोर्ट्स ॲन्ड फिटनेस ही भारतातील अग्रगण्य स्पोर्ट्स आणि फिटनेस रिटेल चेन असून, विविध क्रीडा साहित्य, फिटनेस उपकरणे आणि लाइफस्टाइल उत्पादने उपलब्ध करून देते. कंपनी जिम सेटअप, आउटडोअर फिटनेस, स्विमिंग पूल उपकरणे, क्रीडा मैदाने तयार करणे, तसेच कस्टमाइज्ड स्पोर्ट्सवेअर अशा विविध सेवा देखील पुरवते.

कंपनीच्या ग्राहकांमध्ये भारतीय सेनादल, नौदल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, मुंबई पोलीस, तेल व नैसर्गिक वायू महामंडळ, भारत पेट्रोलियम, बजाज ऑटो, गोदरेज, आयटीसी, हयात, जे डब्ल्यू मेरीट, फोर सीझन्स, मुंबई क्रिकेट असोसिएशन तसेच अनेक शैक्षणिक संस्था आणि रिअल इस्टेट कंपन्यांचा समावेश आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश