दगडूशेठ गणपती मंदिरावर अंगारकीनिमित्त 'दाक्षिणात्य' पुष्पआरास* फुलांमध्ये विविध देवतांच्या प्रतिमा ; देशी फुलांनी सजले मंदिर
*दगडूशेठ गणपती मंदिरावर अंगारकीनिमित्त 'दाक्षिणात्य' पुष्पआरास*
फुलांमध्ये विविध देवतांच्या प्रतिमा ; देशी फुलांनी सजले मंदिर
पुणे : अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'दाक्षिणात्य' पद्धतीची पुष्पआरास करण्यात आली. मंदिराच्या पायथ्यापासून ते कळसापर्यंत विविधरंगी फुलांनी मंदिर सजले. कळसावरील फुलांमध्ये विविध देवतांच्या प्रतिमा देखील साकारण्यात आल्या. चतुर्थीनिमित्त भाविकांनी पहाटेपासून गणरायाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पहाटे ३ वाजता ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक पार पडला. त्यानंतर सकाळच्या व दुपारच्या सत्रात गणेशयागाचे देखील आयोजन करण्यात आले होते.
मंदिराच्या पुढच्या बाजूला फुलांमध्ये गजराजाच्या प्रतिमा साकारण्यात आल्या आहेत. तसेच पुष्प सजावटीकरिता यंदा देशी फुलांचा वापर करण्यात आला. यामध्ये झेंडू, शेवंती या फुलांचा प्रामुख्याने समावेश होता, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी दिली.
Comments
Post a Comment