*१ मे महाराष्ट्र दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन ‘AI समर बूटकॅम्प’, एक अनोखी संधी* - *मिलिंद कांबळे*

*१ मे महाराष्ट्र दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन ‘AI समर बूटकॅम्प’, एक अनोखी संधी* - *मिलिंद कांबळे*


पुणे दि —- सध्या प्रत्येक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वेगाने प्रगती करत असून, शिक्षण व करिअरच्या दृष्टीने तिचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर Koutuhal.ai या AI स्टार्टअपने महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एक अनोखा ऑनलाइन ‘AI समर बूटकॅम्प’ उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाची सुरुवात १ मे २०२६, महाराष्ट्र दिनानिमित्त पुण्यातून होणार आहे.

या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना AI चे शिक्षण मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांना समान संधी मिळणार आहे.

पद्मश्री मिलिंद कांबळे, अध्यक्ष आय आय एम, जम्मू यांनी विद्यार्थ्यांना आवाहन करताना सांगितले की, “नव्या युगातील प्रत्येक विद्यार्थ्याने AI सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा आणि भविष्यासाठी स्वतःला सज्ज करावे.”

हा १० दिवसांचा बूटकॅम्प विद्यार्थ्यांना २० अत्याधुनिक AI टूल्सची ओळख करून देणार आहे. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली होणारी लाईव्ह सत्रे, प्रात्यक्षिक प्रोजेक्ट्स आणि इंटरअॅक्टिव्ह शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळणार असून, त्यांच्या विचारशक्ती, सर्जनशीलता आणि समस्या सोडवण्याच्या क्षमतेत लक्षणीय वाढ होईल.

शैक्षणिक तज्ज्ञांच्या मते, AI साक्षरता ही आता केवळ पर्याय नसून भविष्यातील आवश्यक कौशल्य ठरत आहे. लहान वयातच AI ची ओळख झाल्यास विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या नव्या संधी खुल्या होतात. या बूटकॅम्पचे समन्वयन Koutuhal.ai मार्फत करण्यात येत असून, इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ घेता येणार आहे.

इच्छुक विद्यार्थ्यांनी या समर बूटकॅम्पमध्ये सहभागी होण्यासाठी आजच Koutuhal.ai या संकेतस्थळाला भेट द्या किंवा WhatsApp वर ९५७९११९७२६ या क्रमांकावर “Hi” पाठवा. असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश