ह्युंदाई मोटरला भारतात 30 वर्षे पूर्ण
ह्युंदाई मोटरला भारतात 30 वर्षे पूर्ण
पुणे,6 मे 2026 : ह्युंदाई मोटर इंडिया लि.(एचएमआयएल) ने भारतात 30 वा स्थापना दिवस आज साजरा केला असून भारतात आद्यप्रवर्तक स्मार्ट मोबिलिटी सोल्युशन्सची तीन दशके पूर्ण केली आहेत.6 मे 1996 रोजी प्रस्थापित झालेली एचएमआयएल भारतातील सर्वांत विश्वासार्ह व लोकप्रिय वाहन ब्रँडसपैकी एक म्हणून विकसित झाली आहे. ह्युंदाईच्या जागतिक प्रवासात भारत हे केंद्रस्थानी राहिले आहे.एचएमआयएल ने कामकाज विस्तार,जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि स्थानिक प्रतिभेला चालना देण्यासाठी 40,700 कोटी रूपयांची गुंतवणूक केली आहे. ह्युंदाईचा भारतातील प्रवास 6 मे 1996 रोजी तमिळनाडूमधील श्रीपेरंबुदुर येथील अद्ययावत उत्पादन प्रकल्पाने झाला.1998 पासून कार्यरत असलेला हा प्रकल्प ह्युंदाईचा कोरिया व्यतिरिक्त पहिला एकात्मिक कार उत्पादन प्रकल्प आहे.वाढत्या गरजांची पूर्तता करण्यासाठी आणि जागतिक केंद्र म्हणून भारताची भूमिका अधिक बळकट करण्याच्या दिशेने एचएमआयएलने तळेगाव उत्पादन प्रकल्प 2025 मध्ये कार्यान्वित केला.चेन्नई आणि तळेगाव मिळून एकंदर वार्षिक उत्पादन क्षमता 9.94 लाख इतकी झाली असून 2028 पर्यंत 10.74 लाख पर्यंत नेण्यात येईल.
Comments
Post a Comment