पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक निमंत्रित 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत विलास क्रिकेट क्लब, अँबिशियस संघांचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक निमंत्रित 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत विलास क्रिकेट क्लब, अँबिशियस संघांचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
पुणे, दि.31 मे 2026: पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक निमंत्रित 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत विलास क्रिकेट क्लब, अँबिशियस या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
सिंहगड क्रिकेट मैदानावरील लढतीत वेंकटेश एच(नाबाद 108) याने केलेल्या धडाकेबाज फलंदाजीसह पार्थ शिंदे 5-33) याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर विलास क्रिकेट क्लब संघाने पारसी जिमखाना संघाचा 7गडी राखून पराभव करत आगेकूच केली.
बारणे क्रिकेट मैदानावरील सामन्यात आर्यन यादव(5-40) याने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर अँबिशियस संघाने व्हेरॉक वेगसरकर क्रिकेट अकादमी संघाचा 39 धावांनी पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. याचबरोबर पुनीत बालन क्रिकेट अकादमी(पीबीसीए), पुना क्लब, केदार जाधव क्रिकेट अकादमी(केजेसीए), ट्रिनिटी, क्लब ऑफ महाराष्ट्र, आर्यन्स क्रिकेट अकादमी या संघांनी देखील उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे.
निकाल: साखळी फेरी:
सिंहगड क्रिकेट मैदान:
पारसी जिमखाना: 45 षटकात 8बाद 226धावा(चैतन्य कोंडभर 67(87,8x4), श्रवण गालफाडे 54(79,3x4,3x6), वेदांत पाटील नाबाद 30, रमण महाडिक 18, मधुर कचरे 13, पार्थ शिंदे 5-33, मुकुंद बाबर 2-54) पराभूत वि.विलास क्रिकेट क्लब: 30.3 षटकात 8बाद 230धावा(वेंकटेश एच नाबाद 108(83,17x4,1x6), सार्थक ढमढेरे 44(30,5x4,3x6), मेधांश जाधव नाबाद 34(24,2x4,3x6), पार्थ शिंदे 16, शिवलिंग व्यवहारे 17, शिवम गोरे 1-34); सामनावीर-पार्थ शिंदे; विलास क्रिकेट क्लब 7 गडी राखून विजयी;
बारणे क्रिकेट अकादमी:
अँबिशियस: 45 षटकात 7बाद 248धावा(आदित्य कापरे 54(89,4x4,1x6), अभिनव केंगर 54(63,2x4,1x6), आयुष म्हाळसकर 52(37,4x4,2x6), ओंकार कदम 24, गुंजन सावंत 20, श्रवण राठोड 2-35)वि.वि.व्हेरॉक वेगसरकर क्रिकेट अकादमी: 41.3 षटकात सर्वबाद 209 धावा(वरद चत्तर 63(69,7x4,1x6), योगेश पवार 32, सुदर्शन तोरडमल 27, अर्जुन गायकवाड 22, आर्यन यादव 5-40, ओंकार कदम 3-35); सामनावीर-आर्यन यादव; अँबिशियस 39 धावांनी विजयी.
Comments
Post a Comment