*बुद्ध पौर्णिमेनिमित्त पुण्यात सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी**- विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणे’ आयोजित “iधम्म पहाट” कार्यक्रमाचे यंदा २० वे वर्ष

*बुद्ध पौर्णिमेनिमित्त पुण्यात सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी*

*- विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणे’ आयोजित “iधम्म पहाट” कार्यक्रमाचे यंदा २० वे वर्ष*

पुणे : तथागत भगवान गौतम बुद्ध पौर्णिमे निमित्त ‘विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणे’ यांच्या वतीने १ ते ३ मे २०२६ दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रयमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कार्यक्रमा दरम्यान भव्य खिरदान वाटपही करण्यात येणार आहे. अशी माहिती समितीचे अध्यक्ष व पुणे शहराचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी विठ्ठल गायकवाड उपस्थित होते.

पुढे बोलताना परशुराम वाडेकर म्हणाले, ‘विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणेच्या वतीने साजऱ्या होणाऱ्या या उपक्रमाचे यंदा 20 वे वर्ष आहे. या अंतर्गत येत्या शुक्रवारी, दि. १ मे २०२६ रोजी पहाटे ५ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पुणे स्टेशन येथे बुद्ध-धम्म गीतांचा ‘मंगलमय पहाट’ हा कार्यक्रम होणार आहे. चेतन चोपडे यांच्या संकल्पनेतून ‘तुझ्या पाऊलखुणा भीमराया’ हा विशेष सांगीतिक कार्यक्रम सादर होणार असून, विकास साळवे, चेतन चोपडे आणि स्नेहल प्रधान यांचा यामध्ये सहभाग असणार आहे.
तसेच, बौद्ध पौर्णिमेनिमित्त शनिवार, दि. २ मे आणि रविवार, दि. ३ मे २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता ‘बुद्ध-धम्म संध्या’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम तथागत गौतम बुद्ध विहार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, जोशी गेट येथे होणार आहे. यामध्ये २ मे रोजी सिने कलाकार तसेच युवा संगीत क्षेत्रातील लोकप्रिय गायक भाग्यश्री अंधारे, संतोष मोरे आणि निखिल महाडे हे बुद्ध - भीम गीते सादर करणार आहेत. तर ३ मे रोजी अशोक गायकवाड आणि त्यांच्या टीमकडून ‘रथ भीमाचा हा नेऊ पुढे’ हा विशेष कार्यक्रम सादर होणार आहे, असे परशुराम वाडेकर यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

‘हात दाखवा कॅब थांबवा’ सीईओ कॅब्स चा उपक्रम**भारतातील पहिली "हायब्रिड" टॅक्सी सेवा- आता प्रवासी आणि चालक दोघांनाही मिळणार सन्मान आणि स्वातंत्र्य**शून्य कमिशन, प्रामाणिक भाडे आणि महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य