पोकोकडून पोको C81 सिरीज लाँच: मोठा डिस्प्ले आणि दैनंदिन गरजांसाठी विश्वासार्ह कार्यक्षमता बेंगळुरू, एप्रिल २३, २०२६ - पोको या तरुण तंत्रज्ञानप्रेमींमध्ये लोकप्रिय
पोकोकडून पोको C81 सिरीज लाँच: मोठा डिस्प्ले आणि दैनंदिन गरजांसाठी विश्वासार्ह कार्यक्षमता बेंगळुरू, एप्रिल २३, २०२६ - पोको या तरुण तंत्रज्ञानप्रेमींमध्ये लोकप्रिय असलेल्या आघाडीच्या ब्रँडने आज पोको C81 सिरीजच्या लाँचची घोषणा केली. या सिरीजमध्ये पोको C81 आणि पोको C81x या दोन मॉडेल्सचा समावेश आहे. विश्वासार्ह परफॉर्मन्स, मोठा आकर्षक डिस्प्ले आणि दीर्घकाळ टिकणारी बॅटरी प्रदान करण्यासाठी डिझाइन केलेली ही नवीन सिरीज दैनंदिन वापरकर्त्यांच्या गरजा पूर्ण करते. दैनंदिन मनोरंजनासाठी मोठा, स्मूद डिस्प्ले पोको C81 सिरीजमध्ये आकर्षक डिस्प्ले आहे, जो दैनंदिन व्युईंग अनुभव उत्साहित करण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे. पोको C81 मध्ये ६.९-इंच एचडी+ डिस्प्ले आहे, तर पोको C81x मध्ये ६.८८-इंच एचडी+ डिस्प्ले आहे. दोन्ही डिवाईसेस ब्राऊझिंग, स्ट्रीमिंग आणि सोशल मीडियासाठी आकर्षक व्हिज्युअल्स देतात. अॅडप्टिव्ह १२० हर्ट्झ रिफ्रेशर रेटसाठी सपोर्टसह दोन्ही डिवाईसेस ईजी स्क्रोलिंग आणि प्रतिसादात्मक परस्परसंवादांची खात्री देतात. तसेच टीयूव्ही ऱ्हेनलँड सर्टिफिकेशन, लो ब्ल्यू लाइटसाठी आय-केअर डिस्प्ले, फ्लिकर अँड सर्काडियन फ्रेण्डली ही वैशिष्ट्ये दीर्घकाळापर्यंत वापरादरम्यान डोळ्यांवर येणारा ताण कमी करण्यास मदत करतात. दैनंदिन गरजांसाठी विश्वासार्ह कार्यक्षमता पोको C81 दैनंदिन वापरासाठी सुलभ व प्रतिसादात्मक अनुभव देतो. एलपीडीडीआर४एक्स रॅम आणि यूएफएस २.२ स्टोरेज असलेला हा डिवाईस जलद अॅप लोड होण्याची आणि सुधारित मल्टीटास्किंग कार्यक्षमतेची खात्री देतो. अँड्रॉईड १६ सह शाओमी हायपरओएस ३ वर संचालित हा डिवाईस अधिक सुधारित आणि वैशिष्ट्य-संपन्न सॉफ्टवेअर अनुभव देतो, तसेच ४ वर्षांचे ओएस अपग्रेड्स आणि ६ वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स देतो, ज्यामधून दीर्घकालीन विश्वसनीयता मिळते. दैनंदिन परस्परसंवाद अधिक उत्साहित करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेल्या या डिवाईसमध्ये अनेक एआय-संचालित वैशिष्ट्ये आहेत, जी नेव्हिगेशन व मल्टीटास्किंग अधिक सोपे करतात. पोको C81x आवश्यक अॅप्लीकेशन्स, संवाद व मनोरंजनासाठी विश्वसनीय कार्यक्षमता देतो. एलपीडीडीआर४एक्स रॅम असलेला हा डिवाईस कार्यक्षमता आणि स्थिर दैनंदिन वापरासाठी ऑप्टिमाइज करण्यात आला आहे. हा डिवाईस २ वर्षे ओएस अपडेट्स आणि ४ वर्षे सिक्युरिटी अपडेट्ससह देखील येतो, ज्यामधून दीर्घकालीन विश्वसनीयता मिळते. दीर्घकाळापर्यंत टिकणाऱ्या बॅटरीसह दैनंदिन सोयीसुविधा अधिक वापरासाठी डिझाइन करण्यात आलेल्या पोको C81 सिरीजमध्ये मोठ्या बॅटऱ्या आहेत, ज्या दिवसभर डिवाईसेसना पॉवर देतात. हे डिवाईसेस एका चार्जमध्ये जवळपास २ दिवस कार्यरत राहतात. दोन्ही डिवाईसेसमध्ये १५ वॅट फास्ट चार्जिंगसह इन-बॉक्स चार्जर, तसेच ७.५ वॅट रिव्हर्स चार्जिंग आहे, ज्यामुळे इतर डिवाईसेस व अॅक्सेसरीजना चार्ज करण्याची सुविधा मिळते. वैविध्यपूर्ण कॅमेरा अनुभव पोको C81 सिरीजमध्ये दैनंदिन फोटोग्राफीसाठी विश्वसनीय कॅमेरा सिस्टम्स आहेत. पोको C81 मध्ये १३ मेगापिक्सल ड्युअल एआय कॅमेरा आहे, जो सुधारित इमेज प्रोसेसिंग आणि विविध स्थितींमध्ये अधिक सुस्पष्टता देतो. पोको C81x मध्ये १३ मेगापिक्सल रिअर कॅमेरा आहे, जो सुस्पष्ट व नैसर्गिक फोटो कॅप्चर करण्यासाठी ऑप्टिमाइज करण्यात आला आहे. दोन्ही डिवाईसेसमध्ये ८ मेगापिक्सल फ्रण्ट कॅमेरा आहे, तसेच ३० एफपीएसमध्ये १०८०पी व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे. याव्यतिरिक्त एचडीआर, नाइट मोड, पोर्ट्रेट व टाइम-लॅप्स अशी उपयुक्त वैशिष्ट्ये आहेत. व्यावहारिक डिझाइनसह दैनंदिन टिकाऊपणा आरामदायीपणा व उपयुक्ततेसाठी डिझाइन करण्यात आलेली पोको C81 सिरीज सडपातळ व वजनाने हलकी रचना देते. पोको C81 ची जाडी ८.१५ मिमी आणि वजन २०८ ग्रॅम आहे, तर पोको C81x ची जाडी ८.२६ मिमी आणि वजन १९३ ग्रॅम आहे, ज्यामधून दिवसभर सुलभ वापराची खात्री मिळते. दोन्ही डिवाईसेसमध्ये साइड-माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सरसह गेस्चर सपोर्ट आणि आयपी५२ रेटिंग आहे, जे धूळ व पाण्याच्या थेंबांपासून संरक्षण देते. कनेक्टीव्हीटी आणि दैनंदिन वैशिष्ट्ये पोको C81 सिरीजमध्ये ब्लूटूथ ५.२, ड्युअल बँड वाय-फाय आणि ३.५ मिमी हेडफोन जॅक आहे, ज्यामधून विनासायास कनेक्टीव्हीटीची खात्री मिळते. दोन्ही डिवाईसेसमध्ये ६४ जीबी स्टोरेज आहे, तसेच स्टोरेज २ टीबीपर्यंत विस्तारित करता येण्यासाठी स्वतंत्र स्लॉट आहे, ज्यामधून वापरकर्त्यांना वाढत्या स्टोरेज गरजांसाठी स्थिरता मिळते. किंमत व उपलब्धता • पोको C81x (३ जीबी + ६४ जीबी): ९,९९९ रूपये • पोको C81 (४ जीबी + ६४ जीबी): १०,९९९ रूपये पोको C81 सिरीज भारतात फ्लिपकार्टवर उपलब्ध असेल आणि विक्रीला २७ एप्रिल २०२६ पासून सुरूवात होईल
Comments
Post a Comment