संपूर्ण स्त्री-आरोग्याचा विचार; पुण्यातील पहिल्या वूमन स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन.
*संपूर्ण स्त्री-आरोग्याचा विचार; पुण्यातील पहिल्या वूमन स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन.*
पुणे शहर आधुनिकतेकडे झपाट्याने वाटचाल करत असताना महिलांच्या आरोग्याविषयी स्वतंत्र, सखोल आणि संवेदनशील विचार करणारी वैद्यकीय व्यवस्था अतिशय गरजेची होती. कारण स्त्रीच्या आरोग्याचा प्रश्न हा केवळ प्रसूतीपुरता किंवा एखाद्या विशिष्ट उपचारापुरता मर्यादित नाही. बाल्यावस्था, पौगंडावस्था, मातृत्व, हार्मोनल बदल, मानसिक आरोग्य, हाडांचे आरोग्य, त्वचा, फिटनेस, रजोनिवृत्ती (menopause) ते वृद्धत्व, स्त्रीच्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर आरोग्याच्या विशिष्ट गरजा समजून घेऊन त्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य वेळी उपचार घेणे महत्त्वाचे आहे.
याच व्यापक दृष्टीकोनातून प्रसिद्ध स्त्रीरोग आणि IVF तज्ञ डॉ. चैतन्य गणपुले यांच्या संकल्पनेतून पुण्यात सुरू झाले आहे Neo Woman Clinic. डॉ. चैतन्य गणपुले, डॉ. रवींद्र कुलकर्णी आणि त्यांच्या सहकारी तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूने अनेक वर्षांचा अभ्यास, अनुभव आणि आरोग्य क्षेत्रातील निरीक्षणांच्या आधारे Neo Woman Clinic साकारले आहे. हे पुण्यातील पहिले आणि एकमेव महिला-केंद्रित स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. महिलांच्या संपूर्ण आरोग्याचा विचार करून उभारलेले हे हॉस्पिटल आरोग्यसेवेतील एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. कारण अनेकदा महिलांना आरोग्याबद्दल संकोच असतो, काही समस्या दुर्लक्षित राहतात तर काही वेळा योग्य तज्ज्ञांकडे वेळेत पोहोचता येत नाही. अशा परिस्थितीत महिलांसाठी सुरक्षित, विश्वासार्ह आणि संवेदनशीलतेची खात्री देणारे Neo Woman Clinic अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पुणेकरांच्या सेवेत सुरू झाले आहे. माननीय महापौर मंजुषा नागपुरे यांच्या शुभहस्ते आणि माननीय आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत Neo woman Clinic चा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
महिलांच्या तसेच नवजात आणि लहान मुलांच्या सर्वांगीण आरोग्यासाठी one-stop healthcare destination म्हणजे Neo Woman Clinic.
*महिला आणि बालकांच्या आरोग्यासंबंधी खालील सर्व सुविधा इथे उपलब्ध आहेत :*
- महिलांसाठी कर्करोग उपचार विभाग (Breast cancer, ovarian cancer, uterus cancer, cervical cancer screening)
- सामान्य शस्त्रक्रिया विभाग
- अनुवंशिक आरोग्य सेवा (Genetic counselling, prenatal testing, hereditary disease screening and future planning care)
- हृदयरोग तपासणी व उपचार सेवा
- न्यूरो (मेंदू व मज्जासंस्था) उपचार सेवा
- सौंदर्य व त्वचा आरोग्य सेवा
- मानसिक आरोग्य समुपदेशन
- तपासणी व निदान विभाग
- दंत आरोग्य सेवा
- वॉटर बर्थिंग प्रसूती सेवा
- सोनोग्राफी, रक्त चाचणी, ECG, 2D Echo, advanced diagnostics
Comments
Post a Comment