पहिल्या-वहिल्या 'महाराष्ट्र शूटिंग लीग स्पर्धेत सांगली अल्फा लायन्सचे वर्चस्व कायम- पालघर आणि सोबो जायंट्समध्ये चुरस



पहिल्या-वहिल्या 'महाराष्ट्र शूटिंग लीग स्पर्धेत सांगली अल्फा लायन्सचे वर्चस्व कायम

- पालघर आणि सोबो जायंट्समध्ये चुरस
 
पुणे, १८ एप्रिल २०२६: महाराष्ट्र रायफल असोसिएशन' आयोजित पहिल्या-वहिल्या 'महाराष्ट्र शूटिंग लीग स्पर्धेत दुसऱ्या दिवशी झालेल्या सामन्यांच्या कामगिरीनुसार सांगली अल्फा लायन्स संघाने १० गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावत आपले वर्चस्व सिद्ध केले.

चत्रगूज नर्सेस स्कुल येथे पार पडलेल्या या स्पर्धेत सांगली अल्फा लायन्सने आतापर्यंत ६ सामन्यांपैकी ५ सामन्यांत दणदणीत विजय मिळवला असून, केवळ एका सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या संघाच्या रायफल गटात आदिती हडगल, प्रतीक जोंग, स्वरा मगदूम आणि अल्फिया अत्तार यांनी तर पिस्तूल गटात प्रणव पाटील, नईम नार्वेकर, वैष्णवी राजे आणि वीरेन गिरीगोसावी यांनी चांगली कामगिरी करीत संघाला अव्वल स्थान मिळवून दिले.
 
पालघर गोल्‍डन फिंगर संघाने ८ गुणांसह दुसऱ्या स्‍थानावर असून सोबो जायंट्स आणि रायगड वॉरियर्स यांच्यात दुसऱ्या स्थानासाठी तीव्र चुरस पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे रायगड वॉरियर्सने आतापर्यंत खेळलेले चारही सामने जिंकून आपली 'विजेती घोडदौड' कायम ठेवली आहे.

पालघर संघाच्या रायफल गटात मयुरी पवार, आदित्री भट, गायत्री पेड्डे आणि अर्णव परब यांनी तर पिस्‍तुल प्रकारात विजय सटोते, श्रीम पसाद, राजवर्धन पाटील आणि निरभाई गिर्से यांनी चांगला खेळ केला. सोबो जायंट्‌स संघाच्या रायफल गटात भक्ती खामकर, आदिती सिंग, श्रिया गोळे आणि सारा वाडके तर पिस्तूल गटात जज मंडल, हेत पटेल, प्रज्ञा केसरकर आणि गझला नौशाद यांनी चांगला खेळ करीत विजय मिळवला.
 
रायगड वॉरियर्स संघाच्या रायफल गटात पार्थ राकेश माने, ईशा अनिल टाकसाळे, राहुल शर्मा आणि दिव्या राजेश धुमाळ यांनी तर पिस्तूल गटात संतोष पी. सावंत, जानवी व्ही. मानटकर, समिधा ए. चव्हाण आणि प्रियांका जी. सुस्विरकर यांनी चांगला खेळ केला.

गुणतालिकेत ५ ते ८ व्या क्रमांकावर अनुक्रमे अहिल्यानगर लक्षवीर, कोल्हापूर बायसन्स, आम्ही पुणेकर आणि सीएसएन मार्क्समन हे संघ प्रत्येकी ६ गुणांसह कायम आहेत. या संघांमध्ये अव्वल चारमध्ये स्थान मिळवण्यासाठी आगामी सामन्यात चुरस पाहायला मिळणार आहे. तर नागपूर टायगर्स, वर्धा वॉरियर्स आणि चंद्रपूर डायमंड्स ४ गुणांसह तालिकेत आपले स्थान टिकवून आहेत.

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

‘हात दाखवा कॅब थांबवा’ सीईओ कॅब्स चा उपक्रम**भारतातील पहिली "हायब्रिड" टॅक्सी सेवा- आता प्रवासी आणि चालक दोघांनाही मिळणार सन्मान आणि स्वातंत्र्य**शून्य कमिशन, प्रामाणिक भाडे आणि महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य