नितीन करडेकर यांच्या काव्यात सृजनशीलता : योगेश सोमण

नितीन करडेकर यांच्या काव्यात सृजनशीलता : योगेश सोमण

काव्य म्हणजे वैश्र्विक आशय सांगणारे साहित्य : योगेश सोमण

प्रा. डॉ. नितीन करडेकर लिखित ‘कनिक’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

पुणे : काव्य म्हणजे संक्षिप्त शब्दसंचायातून संपूर्ण भावनेला उद्‌गारीत करणारे, वैश्र्विक आशय सांगणारे साहित्य होय. कवी आपल्या प्रतिभेतून, अभ्यासपूर्ण शैलीतून अंतर्नादाची निर्मिती करीत असतो. काव्याच्या माध्यमातून ‘स्व’पासून समेष्टीपर्यंत विरघळत जात भावना संस्थापित करतो, असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी केले.

प्रा. डॉ. नितीन करडेकर लिखित ‘कनिक’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन आज (दि. ५) महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात योगेश सोमण यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. वेदांतश्री: प्रकाशनतर्फे काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आला आहे. बालसाहित्यिका, कवयित्री डॉ. संगीता बर्वे, तंत्रशिक्षण संचालनालयाचे सहसंचालक डॉ. धनपाल कांबळे, प्रकाशक सुनील उंब्रजकर, टाटा मोटर्सचे उपमहाव्यवस्थापक महेंद्र मोटे, नारायण कुंभार, मनोहर सोमवंशी मंचावर होते.

लेखनाविषयी बोलताना प्रा. डॉ. नितीन करडेकर म्हणाले, मी तंत्रक्षेत्रात कार्यरत असूनही काव्यनिर्मिती करताना माझ्यातील अस्वस्थता, सर्जनशीलता, प्रत्येक विचारात दडलेला गभितार्थ काव्यनिर्मितीसाठी उपयुक्त ठरला. अभियंता ज्या प्रमाणे सातत्याने नवनिर्मितीसाठी कार्यरत असतो, त्या प्रमाणे साहित्यिक देखील शब्दभावनांसह निर्मितीसाठी प्रयत्नशील असतो.

योगेश सोमण म्हणाले, कवीच्या अस्वस्थतेमधून काव्याची निर्मिती होत असते. नितीन करडेकर यांच्या काव्यातून सृजनशीलता आणि अस्वस्थता जाणवते. ही सृजनशील अस्वस्थता त्यांनी कायम जपत रहावी.

डॉ. संगीता बर्वे म्हणाल्या, प्रत्येक व्यक्तीने बालपणापासूनच वाचन, काव्य आणि रसिकतेचे बीज आपल्या आंतरआत्म्यात जपलेले असते. त्या बिजातून वृक्ष निर्मिती होण्यास योग्य तो कालावधी यावा लागतो. जीवनातील अनुभव, शब्दांची उर्जा यातून काव्याची निर्मिती होते. नितीन करडेकर यांच्या काव्यातून त्यांची सर्जनशीलता दिसून येते. मराठी भाषा जपण्यासाठी, ती प्रवाहित होण्यासाठी, पुढील पिढीत संक्रमित होण्यासाठी साहित्यनिर्मिती होणे गरजेचे वाटते. उदंड गवतासारखी काव्यनिर्मिती होत असली तरी बंजरभूमीपेक्षा हिरवळ पसरणे गरजेचे वाटते.

पुस्तकाच्या निर्मितीमागील भूमिका मांडताना सुनील उंब्रजकर म्हणाले, डॉ. नितीन करडेकर यांच्या काव्यात पूर्वकालीन आणि समकालीन कवींचे अनुकरण जाणवत नाही. तसेच नवखेपणाची खूणही आढळत नाही.

डॉ. धनपाल कांबळे, महेंद्र मोटे यांन मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकपर स्वागत नारायण कुंभार यांनी केले. उपस्थितांचे स्वागत डॉ. नितीन करडेकर, डॉ. नीलम करडेकर, प्रशांत बनकर, नरेंद्र सोमवंशी, मनोहर सोमवंशी, नितेश सोमवंशी यांनी केले. सूत्रसंचालन ऋचा कर्वे यांनी केले तर आभार मनोहर सोमवंशी यांनी मानले. सुरुवातीस अथर्व बोत्रे यांनी बासरीवर राग भटियार सादर केला.

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

‘हात दाखवा कॅब थांबवा’ सीईओ कॅब्स चा उपक्रम**भारतातील पहिली "हायब्रिड" टॅक्सी सेवा- आता प्रवासी आणि चालक दोघांनाही मिळणार सन्मान आणि स्वातंत्र्य**शून्य कमिशन, प्रामाणिक भाडे आणि महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य