समृद्ध भारताच्या निर्मितीत युवकांची भूमिका महत्त्वाची : दीपक करंजीकर

*समृद्ध भारताच्या निर्मितीत युवकांची भूमिका महत्त्वाची : दीपक करंजीकर* पुणे : समृद्ध भारत घडवण्यासाठी केवळ शासनाच्या योजना पुरेशा नाहीत, तर प्रत्येक नागरिकाने स्वतःची जबाबदारी ओळखून प्रामाणिकपणे योगदान देणे अत्यावश्यक आहे. तरुणांनी केवळ नोकरीकडे न पाहता रोजगारनिर्मितीकडे वळावे, नवीन संधी शोधाव्यात आणि देशाच्या विकासात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रख्यात अर्थकारण व समाजकारण अभ्यासक दीपक करंजीकर यांनी केले.

नागरिक सोशल फाउंडेशन आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले “समृद्ध भारत आणि मी” या विषयावरील व्याख्यानात करंजीकर बोलत होते, या प्रसंगी नागरिक सोशल फाउंडेशनचे संचालक  प्रितम थोरवे,अमेय सप्रे, शेखर यादव, वक्ता विभागाचे प्रमुख दीपक मेहेंदळे आदि मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना करंजीकर म्हणाले,  भारताची समृद्धी ही केवळ आर्थिक बाबींवर अवलंबून नसून, सांस्कृतिक मूल्ये, नैतिकता, पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक एकता या घटकांवरही तितकीच अवलंबून असल्याचे त्यांनी नमूद केले. डिजिटल युगात भारत वेगाने प्रगती करत असताना, त्या प्रगतीला योग्य दिशा देण्याची जबाबदारी युवकांवर आहे.

कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध प्रश्न विचारले. प्रश्नोत्तरांच्या सत्रात करंजीकर यांनी विद्यार्थ्यांच्या शंका समाधानकारक पद्धतीने दूर केल्या. यामुळे कार्यक्रम अधिक संवादात्मक आणि प्रभावी ठरला.

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

‘हात दाखवा कॅब थांबवा’ सीईओ कॅब्स चा उपक्रम**भारतातील पहिली "हायब्रिड" टॅक्सी सेवा- आता प्रवासी आणि चालक दोघांनाही मिळणार सन्मान आणि स्वातंत्र्य**शून्य कमिशन, प्रामाणिक भाडे आणि महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य