सुखी जीवनसाठी “सायबर सजग” रहाणे अत्यावश्यक .डॉ. दीपक शिकारपूर
सुखी जीवनसाठी “सायबर सजग” रहाणे अत्यावश्यक .
डॉ. दीपक शिकारपूर यांचे मत
जगात व्यवहार करतांना एखाद्या चुकीमुळे आपले व कुटुंबाचे आयुष्य धोक्यात येऊन कधीही भरून न येणारे नुकसान होउ शकते.या साठी प्रत्येक नागरिकाने फेस बुक, लिंक्ड इन,ट्विटर ,यु ट्यूब आणि व्हॉटस अप या सारखी सोशल मिडिया, तसेच बँक खाती वापरताना सजगता दाखविणे आवश्यक आहे.आरोग्य,वाहन,जीवन विमा तसेच बँकिंग मध्ये मर्यादित विमा संरक्षण असते परंतु या सारखे कुठल्याही प्रकारचे विमा सरंक्षण सायबर गुन्ह्यामुळे झालेल्या नुकसानीसाठी उपलब्ध नाही.या मुळे प्रत्येक नागरिकाने सुखी जीवनसाठी सायबर जगात सुरक्षितेसाठी सजग राहण्याचे आवाहन डॉ. दीपक शिकारपूर यांनी केले. ते कलामंच प्रस्तुत वसंत व्याख्यान मालेत "सायबर सजगता" या विषयावर बोलत होते.
या वेळी अध्यक्ष वसुधा कर्दळे, नगर सेविका सौ मंजुश्री खर्डेकर आणि अनेक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
इंटर नेट द्वारे पाठविलेल्या संदेशाचे पृथक्करण गुन्हेगार करतात.त्या द्वारे लॉटरी लागली आहे,पार्सल पाठविले आहे मदत करा,पैसे दुप्पट करून देतो असे आमिष दाखवून लोभ निर्माण करतात.त्याला बळी पडू नका,अधीर होऊ नका.
गुन्हेगार आपला पासवर्ड चोरी करताना आपले नाव,आडनाव,जन्म तारीख इत्यादी अशी माहिती एकत्र करून बनावट पासवर्ड करण्याचा प्रयत्न करतात.ती माहिती टाळून पासवर्ड तयार करा व तो कोणालाही सांगू नका व तो सतत बदलत रहा.आता व्हॉट्स अप अकौंट हॅक (चोरी)होण्याचा नवीन प्रकार सुरु झाला आहे. बँकेतील खाते,लॉकर ए टी एम मशीनचा वापर व होम बँकिग वापराविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.–
मुलांना मोबाईल देण्याचे प्रमाण आता खूपच वाढले आहे. मुलांना मोबाईलचा वापर,सोशल मिडिया या संबंधी अधिक माहिती देण्यासाठी संस्कृतिक संस्कार वर्गाबरोबर सायबर संस्कार होणे गरजेचे आहे अशी सूचना केली.काही लोक केवळ बदनामी व भीती पोटी सायबर गुन्ह्याची नोंद करत नाहीत. सायबर गुन्ह्यात फसलेल्या लोकांनी पोलीसात गुन्हा नोंदविल्यास पैसे परत मिळण्याची शक्यता असते असेही सांगितले.
Comments
Post a Comment