तिप्पट चॉकलेट, तिप्पट प्रेम: एक ‘दिलदार’ क्षण – विनोद कांबळीसह दिनशॉजची नवीन मोहीम भूतकाळातील सुखद आठवणी, औदार्य आणि थोडे अधिक मिळण्याचा आनंद साजरा करणारी, मनापासून साकारलेली एक मोहीम
तिप्पट चॉकलेट, तिप्पट प्रेम: एक ‘दिलदार’ क्षण – विनोद कांबळीसह दिनशॉजची नवीन मोहीम
भूतकाळातील सुखद आठवणी, औदार्य आणि थोडे अधिक मिळण्याचा आनंद साजरा करणारी, मनापासून साकारलेली एक मोहीम
मुंबई, 20 एप्रिल, 2026: भारतातील सर्वात आवडत्या डेझर्टपैकी एक दिनशॉने या उन्हाळ्यासाठी एक नवीन मोहीम राबवली आहे. जी आईस्क्रीम कोनच्या शेवटच्या घासाला एक वेगळाच फील देईल. आपल्या नवीन ‘दिलदारी’ मोहिमेच्या शुभारंभासोबतच या ब्रँडने आपला कोन अपग्रेड केला असून कोनच्या तळाशी तिप्पट घट्ट चॉकलेट ठेवले आहे. आणि हा आनंद हाच या मोहिमेचा गाभा आहे.
भारताचे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांच्या नेतृत्वाखाली, ही मोहीम जुन्या आठवणी आणि भावनांना एकत्र आणून एक स्पष्ट आणि प्रभावी संदेश देते: लहान कृतींचाही प्रभाव मोठा पडतो. या मोहिमेच्या केंद्रस्थानी दिनशॉजचा सुधारित कोन आहे, जो ‘दिलदारी’चे खऱ्या अर्थाने प्रतीक असलेला एक अनुभव आहे. आता कोनच्या खालच्या टोकाला तिप्पट अधिक घट्ट चॉकलेट असल्याने, ग्राहक सहजपणे जपून ठेवत असलेल्या शेवटच्या घासाचे रूपांतर एका वेगळ्या, सुखद अनुभवात होते.
अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या या क्षणाला विशेष महत्त्व देऊन, हा ब्रँड एका रोजच्या आनंदाचे रुपांतर अधिक समाधानकारक आणि अविस्मरणीय अनुभवात करतो. हा आनंद एका उबदार आणि भावस्पर्शी कथानकाद्वारे उलगडतो; ज्याच्या प्रमुख भूमिकेत आहेत विनोद कांबळी. आश्वासने, आलेले अडथळे आणि त्यातून सावरण्याची जिद्द यांनी भरलेला त्यांचा हा जीवनप्रवास या कथेला अस्सलपणा आणि खोली प्रदान करतो. "ज्यांना आयुष्यात थोडे कमी मिळाले, त्यांच्यासाठी थोडे जास्त" यावर आधारित ही जाहिरात दिनशॉजच्या विचारपूर्वक केलेल्या उदारतेचे तत्त्वज्ञान सांगते. जिथे 'थोडे अधिक' देण्यामुळे एक अर्थपूर्ण फरक घडू शकतो.
या जाहिरातीबद्दल दिनशॉचे संचालक झर्विन राणा म्हणाले, "ग्राहकांना खरोखर काय आवडते, हे समजून घेण्यातूनच अर्थपूर्ण नवनिर्मिती जन्माला येते. अनेक लोकांसाठी, कोनचा शेवटचा घास हा त्या संपूर्ण अनुभवातील सर्वात समाधानकारक भाग असतो. तो भाग अधिक समृद्ध आणि आनंददायी बनवून, आम्हाला अशी एक गोष्ट निर्माण करायची होती जी एकाच वेळी आनंददायी आणि विचार करायला भाग पाडणारी असेल. 'दिलदारी' ही आमची 'थोडे अधिक' देण्याच्या भावनेचा उत्सव साजरा करण्याची एक पद्धत आहे—जी साधी, आपल्याशी नाते जोडणारी आणि अविस्मरणीय ठरेल."
3x चॉकलेट कोनची नवीन श्रेणी बदाम रोस्टेड, बटरस्कॉच, कॅरामल डोल्से, चोको चिप, चॉकलेट ब्राउनी, चॉकलेट गनाश, कुकीज एन क्रीम, मिसिसिपी डार्क आणि मोका ब्लॅक अँड व्हाईट अशा अत्यंत नऊ लज्जतदार फ्लेवर्समध्ये उपलब्ध आहे. प्रत्येक कोनची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की, ती चॉकलेटची चव अधिक उत्तम देईल आणि शेवटचा घासही जीभेवर रेंगाळणारा, अत्यंत समाधानकारक ठरेल.
या मोहिमेमागील सर्जनशील विचाराबाबत वोम्बच्या वरिष्ठ क्रिएटिव्ह पार्टनर, गुंजन गाबा म्हणाल्या, "कधीकधी आयुष्य थोडे अन्याय करणारे आणि विषमतेने भरलेले वाटत असते. पण आयुष्य सर्वांना नेहमीच समान आनंद देते - मोठ्या, नाट्यमय मार्गांनी नव्हे, तर छोट्या, अनपेक्षित आनंदांमधून. दिनशॉसाठीची आमची नवीन मोहीम याच साध्या कल्पनेवर आधारित आहे, "ज्यांना आयुष्यात थोडे कमी मिळाले... त्यांच्यासाठी थोडे जास्त." हा विचार 3X चॉकलेट टिपच्या रुपात दिनशॉच्या दिलदारीच्या तत्त्वज्ञानामध्ये अगदी चपखल बसला.
यासाठी आम्हाला अशी व्यक्ती हवी होती, जिने हा प्रवास अनुभवला आहे. यासाठी विनोद कांबळी ही अत्यंत योग्य निवड होती: नैसर्गिक प्रतिभा, सुरुवातीची चमक, एक अपूर्ण प्रवास आणि ‘आयुष्यात तो यापेक्षा कितीतरी अधिक मिळवण्यास पात्र होता’ ही भावना."
सध्या रणरणतं ऊन असताना आणि क्रिकेट हंगामाच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेली ‘दिलदारी’ मोहीम, ही अशा एका क्षणाला टिपण्यासाठी रचण्यात आली आहे - जेव्हा खाण्याची अनिवार ओढ लागलेली असते, जुन्या आठवणी अगदी जवळच्या वाटतात आणि छोट्या-छोट्या मौजमजांना सर्वाधिक महत्त्व असते. या नव्या उपक्रमाद्वारे, दिनशॉ केवळ एक नवीन कोन सादर करत नाही; तर या कोनाचा शेवटचा घास हाच उन्हाळ्यातील सर्वात गोड भाग असल्याचे ते नव्याने अधोरेखित करत आहेत.
Comments
Post a Comment