समानता सामाजिक विचारांची” हे पुस्तक प्रकाशितसलील जव्हेरी यांनी लिहिलेल्या व अनुराधा पब्लिकेशन निर्मित “समानता सामाजिक विचारांची” या पुस्तकाचे प्रकाशन आज भारत इतिहास संशोधक मंडळ येथे करण्यात आले.
“समानता सामाजिक विचारांची” हे पुस्तक प्रकाशित
सलील जव्हेरी यांनी लिहिलेल्या व अनुराधा पब्लिकेशन निर्मित “समानता सामाजिक विचारांची” या पुस्तकाचे प्रकाशन आज भारत इतिहास संशोधक मंडळ येथे करण्यात आले.
या वेळी यशदाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी राजीव नंदकर ,ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य श्याम भुर्के,निवृत्त सहाय्यक पोलीस,महाराष्ट्र पोलीस श्रीमती स्मिता पाठक, लेखक सलील जव्हेरी,अनुराधा पब्लिकेशनच्या चेतना नंदकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते
कार्यक्रमाची सुरवात गीता भुर्के यांनी गायलेल्या ईशस्तवनाने झाली.
लेखकाचे मनोगत व्यक्त करतांना सलील जव्हेरी म्हणाले”रीतीरिवाज आणि पारंपरिक मानसिकतेमुळे महिलांची भूमिका अनेकदा चूल आणि मुलांपुरती मर्यादित राहिली. मात्र, महिलांमध्ये असलेली अपार क्षमता ओळखून त्यांना स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देणे आणि स्त्री-पुरुष दोघांकडूनही १०० टक्के योगदान मिळवणे हे या पुस्तकाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.मला आयुष्यात भेटलेल्या अनेक व्यक्तींच्या अनुभव, विचार आणि निस्वार्थ प्रेरणेतून हे पुस्तक साकारले आहे.”
श्याम भुर्के म्हणाले “समानता सामाजिक विचारांची “ हे पुस्तक सकारात्मक विचार, आत्मविश्वास आणि संकटांना संधी म्हणून पाहण्याचा संदेश देणारे आहे. समाजकार्याच्या अनुभवातून लेखकांनी समाजातील समस्या समजून त्यावर मार्गदर्शन केले आहे.पुस्तकात स्त्रीसन्मान, एकत्र कुटुंब पद्धती आणि “एकमेका सहाय्य करू” या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले आहे.तसेच समुपदेशनाचे महत्त्व स्पष्ट करत विविध घटकांसाठी उपयुक्त मार्गदर्शन दिले आहे.समाजातील विषमता कमी करून माणुसकी आणि जागृती वाढविणारे हे पुस्तक प्रेरणादायी आहे ”
राजीव नंदकर म्हणाले “ माणूस समाजप्रिय असला तरी आजच्या धावपळीच्या, स्पर्धात्मक आणि सोशल मीडियाच्या युगात संवाद आणि नातेसंबंध कमी होत चालले आहेत.या पार्श्वभूमीवर हे पुस्तक सामाजिक समस्यांकडे सकारात्मक आणि वास्तववादी दृष्टीकोन देणारे आहे. बालपणापासून वृद्धत्वापर्यंत तसेच वैयक्तिक आणि सामाजिक जीवनातील विविध विषयांवर या पुस्तकात मार्गदर्शन केले आहे. लिंगभेद, हुंडा, विवाह, समुपदेशन आणि जबाबदार नागरिकत्व यांसारख्या मुद्द्यांवर विचारमंथन करून मानवी मनाचे आरोग्य जपण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हे पुस्तक वाचकांना अंतर्मुख करून सकारात्मक दृष्टिकोनातून आनंदी आणि सुसंस्कृत समाज घडवण्याची प्रेरणा देणारे आहे .”
डॉ.स्मिता पाठक यांनी मनोगत व्यक्त केले.डॉ राजस्विनी थोरवे यांनी सूत्रसंचालन केले. सायली जव्हेरी यांनी आभार मानले.
Comments
Post a Comment