वर्ध्याच्या प्राची कात्रेकडे महाराष्ट्राचे नेतृत्व - महिला सब-ज्युनियर राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी १८ सदस्यीय संघाची घोषणा

वर्ध्याच्या प्राची कात्रेकडे महाराष्ट्राचे नेतृत्व 

- महिला सब-ज्युनियर राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी १८ सदस्यीय संघाची घोषणा

पुणे, २ एप्रिल: रांची (झारखंड) येथे सुरू झालेल्या १६व्या हॉकी इंडिया सब-ज्युनियर महिला राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठीच्या महाराष्ट्राच्या १८ सदस्यीय संघाचे नेतृत्व वर्ध्याची फॉरवर्ड प्राची कात्रे हिच्याकडे सोपविण्यात आले आहे. ही स्पर्धा १ ते १२ एप्रिल, २०२६ दरम्यान होईल.

मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, नेहरूनगर-पिंपरी येथे राज्यातील सर्व मुलींसाठीच्या निवडचाचणीनंतर हॉकी महाराष्ट्राचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि हॉकी इंडियाचे सहयोगी उपाध्यक्ष मनोज भोरे यांनी महाराष्ट्राच्या संघाची घोषणा केली.

हॉकी महाराष्ट्र संघाचा एलिट डिव्हिजन ‘ए’ मध्ये पूल-एमध्ये समावेश असून त्यात हॉकी झारखंड आणि हॉकी बिहार हे अन्य संघ आहेत.

हॉकी महाराष्ट्र संघात पुण्याचे आठ, साताऱ्याचे तीन, यवतमाळचे दोन तसेच कोल्हापूर, रायगड, मुंबई, नागपूर आणि ठाणे येथील प्रत्येकी एक खेळाडू आहे.

फॉरवर्ड जान्हवी चव्हाणची (पुणे) उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली.

हॉकी महाराष्ट्र संघ सलामीचा सामना ५ एप्रिल रोजी हॉकी बिहारविरुद्ध खेळेल. त्यानंतर ६ एप्रिल रोजी हॉकी झारखंड संघाशी दोन हात करेल.

महाराष्ट्र संघ:

गोलकीपर: नुपूर सुर्वे (पुणे); ऋषिका नवलखा (पुणे). डिफेंडर: दीक्षा कापसे (पुणे); मृण्मयी घोरपडे (सातारा). मिडफिल्डर: अद्विता कांबळे (ठाणे); अर्पिता कोंजारे (पुणे); मैत्री ठाकरे (नागपूर); गौरी हिरणवाले (सातारा); कॅलिन नेसमनी (पुणे); इफ्त पटेल (पुणे). फॉरवर्ड: प्राची कात्रे (संघनायिका; यवतमाळ); प्रसिद्धी कांबळे (कोल्हापूर); अन्वी रावत (पुणे); जान्हवी चव्हाण (उपकर्णधार; पुणे); पूर्वा दुपारे (यवतमाळ); वेदिका वाघमोरे (सातारा); श्रेया पाटील (रायगड); सुनेली बुरह (मुंबई).

प्रशिक्षक : सागरसिंग ठाकूर; व्यवस्थापक: मनीषा आकरे.

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

‘हात दाखवा कॅब थांबवा’ सीईओ कॅब्स चा उपक्रम**भारतातील पहिली "हायब्रिड" टॅक्सी सेवा- आता प्रवासी आणि चालक दोघांनाही मिळणार सन्मान आणि स्वातंत्र्य**शून्य कमिशन, प्रामाणिक भाडे आणि महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य