टाटा मोटर्सने बिलियनई मोबिलिटीला इलेक्ट्रिक प्राइमा ई.५५एसची पहिली बॅच सुपूर्द केली; शून्य-उत्सर्जन मालवाहतुकीच्या दिशेने वाटचाल सुरू केली२५० अतिरिक्त प्राइमा ई.५५एस इलेक्ट्रिक प्राइम मूव्‍हर्सच्‍या ऑर्डरची घोषणा



टाटा मोटर्सने बिलियनई मोबिलिटीला इलेक्ट्रिक प्राइमा ई.५५एसची पहिली बॅच सुपूर्द केली; शून्य-उत्सर्जन मालवाहतुकीच्या दिशेने वाटचाल सुरू केली
२५० अतिरिक्त प्राइमा ई.५५एस इलेक्ट्रिक प्राइम मूव्‍हर्सच्‍या ऑर्डरची घोषणा

मुंबई, १० एप्रिल २०२६: टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनीने आज बिलियनई मोबिलिटीला प्राइमा ई.५५एस इलेक्ट्रिक प्राईम मूव्हर्सची डिलिव्‍हरी सुरू केली. यासोबत कंपनीने आणखी २५० इलेक्ट्रिक प्राइम मूव्हर्सची ऑर्डर मिळाल्याची घोषणाही केली, ज्‍यामधून अवजड मालवाहतुकीच्या क्षेत्रात शून्य-उत्सर्जन क्रांती वेगाने होत असल्याचे दिसून येते. या वाहनांचा पुरवठा टप्प्याटप्प्याने केला जाईल आणि गुजरात, राजस्थान, तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, दिल्ली एनसीआर व हरियाणा यांसारख्या प्रमुख मालवाहतूक कॉरिडॉर्समध्ये स्टील, सिमेंट आणि इतर औद्योगिक मालाच्या लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी त्यांचा वापर केला जाईल.

ट्रकची पहिली बॅच टाटा मोटर्स लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर व सीईओ श्री. गिरीश वाघ; बिलियनई मोबिलिटी व चार्जझोनचे संस्थापक श्री. कार्तिकेय हरियाणी आणि टाटा मोटर्सचे व्हाइस प्रेसिडेंट व ट्रक्स बिझनेस हेड श्री. राजेश कौल, तसेच दोन्ही कंपन्‍यांमधील वरिष्ठ नेतृत्व टीम्‍सच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आली.

ई-ट्रक्सचा स्वीकार करताना बिलियनई आणि चार्जझोनचे संस्थापक श्री. कार्तिकेय हरियाणी आणि बिलियनई मोबिलिटीचे सीईओ श्री. संजीव कुलकर्णी म्हणाले, “बिलियन इलेक्ट्रिक मोबिलिटीमध्ये आमचा भर अशा इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहन उपायांवर आहे, जे आंतरराज्यीय मार्गांवरील प्रत्यक्ष मालवाहतुकीत विश्वसनीय आणि मोठ्या प्रमाणावर तैनात केले जाऊ शकतात. आम्ही टाटा मोटर्ससोबत धोरणात्मक सहयोग करत आहोत, जेथे आमचा पद्धतशीरपणे मोठ्या प्रमाणावर वाहने खरेदी करण्याचा आणि येत्या ६ ते १८ महिन्यांत भारतातील अवजड मालवाहतुकीसाठी १,५०० युनिट्स तैनात करण्याचा मनसुबा आहे. टाटा प्राइमा इ्र.५५एस विविध उपयोगांसाठी आवश्यक असलेली कामगिरी, विश्वासार्हता आणि कार्यक्षमता प्रदान करते. आमच्या लांब पल्ल्याच्या मालवाहतूक क्षमता वाढवण्यासाठी, ४५० केडब्‍ल्‍यूएच बॅटरी क्षमता असलेला भारतातील आपल्या श्रेणीतील सर्वात मोठा ट्रक, प्राइमा ई.५५एस ४५० केडब्‍ल्‍यूएच ताफ्यात सामील करताना आम्हाला आनंद होत आहे.”  

आपला दृष्टिकोन व्यक्त करताना, टाटा मोटर्स लि. चे उपाध्यक्ष आणि बिझनेस हेड – ट्रक्स, श्री. राजेश कौल म्हणाले, “जेव्हा वाहने प्रत्यक्ष कार्यान्वयनाच्या परिस्थितीनुसार - म्हणजेच ड्युटी सायकल, अपटाइम, ऊर्जा कार्यक्षमता आणि मालकीचा एकूण खर्च - यांसाठी तयार केली जातात, तेव्हा इलेक्ट्रिक ट्रकिंग मोठ्या प्रमाणावर यशस्वी होते. याच ॲप्लिकेशन-आधारित दृष्टिकोनाने विकसित केलेल्या प्रिमा ई.५५एस मध्ये भारतातील पहिला उच्च-कार्यक्षमतेचा ई-ॲक्सल, एक प्रगत बॅटरी व्यवस्थापन प्रणाली आणि ड्युअल चार्जिंग पोर्ट्स यांचा संगम आहे. याला विस्तारित रेंज आणि आव्हानात्मक ड्युटी सायकलसाठी डिझाइन केलेल्या, सेगमेंटमधील अग्रगण्य ४५० kWh बॅटरी पॅकचा आधार आहे. या तंत्रज्ञानामुळे उत्तम कार्यक्षमता, जास्त अपटाइम आणि कमी परिचालन खर्च मिळतो, ज्यामुळे ग्राहकांना जलद परतावा मिळवणे शक्य होते. बिलियनई मोबिलिटीसोबतच्या आमच्या घनिष्ठ सहकार्यामुळे वाहन आणि त्याला आधार देणाऱ्या इकोसिस्टममध्ये सुसंवाद सुनिश्चित झाला आहे, ज्यामुळे प्रमुख मालवाहतूक मार्गांवर विश्वसनीय इलेक्ट्रिक ऑपरेशन्स शक्य झाल्या आहेत.”

 

टाटा मोटर्सच्या विस्तृत टाटा Trucks.EV श्रेणीचा भाग असलेला टाटा प्राइमा ई.५५एस ट्रक आय-एमओईव्‍ही (i-MoEV)वर आधारित आहे, जी टाटा मोटर्सची प्रगत इलेक्ट्रिक वाहन आर्किटेक्चर आहे. यामध्ये एकात्मिक ई-अॅक्‍सल आणि रिजनरेटिव्ह ब्रेकिंगसह पूर्णपणे इलेक्ट्रिक ड्राइव्हट्रेन देण्यात आली आहे. ४५० केडब्‍ल्‍यूएच बॅटरी पॅकसह सज्ज असलेला हा ट्रक एका चार्जमध्‍ये ३५० किमी पर्यंतची रेंज देतो. या ट्रकच्या मुख्य वैशिष्ट्यांमध्ये ३-स्पीड ऑटो शिफ्ट ट्रान्समिशन, ड्युअल-गन फास्ट-चार्जिंग क्षमता आणि सुरक्षा तंत्रज्ञानाचा समावेश आहे. यामध्ये ड्रायव्हर मॉनिटरिंग सिस्टम, लेन डिपार्चर वॉर्निंग, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, क्रूझ कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक ब्रेकिंग सिस्टम आणि पर्यायी एडीएएस यांसारखी सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये आहेत. प्रीमियम प्राइमा केबिन ड्रायव्हरचा आराम आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी डिझाइन केली आहे, जे लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

टाटा मोटर्स बॅटरी इलेक्ट्रिक, सीएनजी, एलएनजी, हायड्रोजन इंटर्नल कम्बशन आणि हायड्रोजन फ्युएल सेल यांसारख्या विविध पर्यायी इंधन तंत्रज्ञानाद्वारे भविष्‍याकरिता सुसज्ज मोबिलिटी सोल्यूशन्स विकसित करत आहे. कंपनीकडे भारतातील पर्यायी इंधनावर चालणाऱ्या व्यावसायिक वाहनांचा सर्वात मोठा पोर्टफोलिओ आहे, ज्यामध्ये लहान व्यावसायिक वाहने, ट्रक, बस आणि व्हॅनचा समावेश आहे. याला कंपनीच्‍या 'संपूर्ण सेवा २.०' उपक्रमांतर्गत एंड-टू-एंड लाइफसायकल सोल्यूशन्स आणि देशभरातील ३,२०० हून अधिक सर्विस पॉइंट्सचे पाठबळ लाभलेले आहे, ज्यामुळे ग्राहकांना विश्वसनीय कामगिरी आणि जास्तीत-जास्त अपटाइम मिळतो.

 


Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

‘हात दाखवा कॅब थांबवा’ सीईओ कॅब्स चा उपक्रम**भारतातील पहिली "हायब्रिड" टॅक्सी सेवा- आता प्रवासी आणि चालक दोघांनाही मिळणार सन्मान आणि स्वातंत्र्य**शून्य कमिशन, प्रामाणिक भाडे आणि महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य