हॉकी महाराष्ट्राचे नेतृत्व सार्थ शिंदेकडे- सब-ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेसाठी १८ सदस्यीय संघाची निवड

हॉकी महाराष्ट्राचे नेतृत्व सार्थ शिंदेकडे

- सब-ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेसाठी १८ सदस्यीय संघाची निवड

पुणे, २ एप्रिल: राजगीर (बिहार) येथे होणाऱ्या १६व्या हॉकी इंडिया सब-ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेसाठीच्या हॉकी महाराष्ट्राच्या १८ सदस्यीय संघाचे नेतृत्व सांगलीचा मिडफिल्डर सार्थ शिंदेकडे सोपविण्यात आले आहे. राष्ट्रीय स्पर्धा १ ते १२ एप्रिल २०२६ दरम्यान होईल.

नेहरूनगर-पिंपरी येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर राज्यातील सर्व मुला-मुलींसाठी निवडचाचणी घेतल्यानंतर हॉकी महाराष्ट्राचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि हॉकी इंडियाचे सहयोगी उपाध्यक्ष मनोज भोरे यांनी महाराष्ट्राच्या संघाची घोषणा केली.

राष्ट्रीय स्पर्धेत हॉकी महाराष्ट्राचा एलिट डिव्हिजनमध्ये पुल ‘ए’ मध्ये समावेश आहे. त्यात हॉकी पंजाब आणि हॉकी चंदीगड हे अन्य संघ आहेत.

टीम हॉकी महाराष्ट्रमध्ये मुंबईचे सात, सांगलीचे तीन, पुणे, नांदेडचे प्रत्येकी दोन, तर नाशिक, कोल्हापूर, जळगाव आणि नागपूरच्या प्रत्येकी एका खेळाडूचा समावेश आहे.

राष्ट्रीय स्पर्धेतील सलामीच्या लढतीत (५ एप्रिल) हॉकी महाराष्ट्रची गाठ हॉकी पंजाब संघाशी होईल. त्यानंतर ६ एप्रिल रोजी हॉकी चंदीगडशी दोन हात करतील.

महाराष्ट्राचा संघ: 

गोलरक्षक : विलास केदार (नाशिक); शिवराज पाटील (सांगली). फॉरवर्ड: ज्ञानेश कुमार (मुंबई); फौआद शेख (मुंबई); ओम पाटील (कोल्हापूर); बलप्रीतसिंग लोणीवाले (नांदेड); योगेश मोसोळीकर (नांदेड); प्रथम पटियाल (पुणे); रेहान खान (जळगाव); यश बामणेल (नागपूर); अधिराज सिंग (पुणे). मिडफिल्डर: रॉयडेन कोली (मुंबई); प्रियांशू विचारे (मुंबई); आमोद घाडगे (मुंबई); सार्थ शिंदे (कर्णधार; सांगली); सुजल दळवी (सांगली). बचावपटू : वेदांत तांबे (मुंबई); चिंगशुबम हेथोइबा (मुंबई).
प्रशिक्षक : गिरीश पिंपळे; प्रशिक्षक : राकेश सुखदेवे; व्यवस्थापक: कॉनरॉय रेमेडिओस.

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

‘हात दाखवा कॅब थांबवा’ सीईओ कॅब्स चा उपक्रम**भारतातील पहिली "हायब्रिड" टॅक्सी सेवा- आता प्रवासी आणि चालक दोघांनाही मिळणार सन्मान आणि स्वातंत्र्य**शून्य कमिशन, प्रामाणिक भाडे आणि महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य