राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्याकर्वेनगर येथील सह्याद्री प्रभात शाखेत मोइरांग स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या
कर्वेनगर येथील सह्याद्री प्रभात शाखेत मोइरांग स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
पुणे, दि. १४ एप्रिल —(प्रतिनिधी)
कर्वेनगर येथील सह्याद्री प्रभात शाखेत "मोइरांग स्वातंत्र्य दिन" मोठ्या उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून अखिल भारतीय पूर्वसैनिक सेवा परिषदेचे पुणे महानगर सचिव, विंग कमांडर अविनाश मुथाळ (नि.) यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण व माहितीपूर्ण ऑडिओ-व्हिज्युअल सादरीकरण केले.
या प्रसंगी त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखालील इंडियन नॅशनल आर्मीच्या शौर्यगाथेचा सविस्तर आढावा घेतला. सुमारे २६,००० सैनिकांनी दिलेल्या बलिदानामुळे मणिपूरमधील जनतेला ब्रिटिश सत्तेतून मुक्ती मिळविण्यास मोठी मदत झाली, असे त्यांनी नमूद केले. तसेच, १४ एप्रिल १९४४ रोजी मणिपूरमधील मोइरांग येथे प्रथमच भारतीय तिरंगा ध्वज फडकावण्यात आल्याची ऐतिहासिक घटना त्यांनी उपस्थितांसमोर जिवंत केली.
विंग कमांडर मुथाळ यांनी मोइरांग स्वातंत्र्य संग्रामातील विविध पैलूंवर प्रकाश टाकत, त्या काळातील घटनांचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांच्या सादरीकरणामुळे उपस्थितांना इतिहासाची सखोल व प्रेरणादायी माहिती मिळाली.
या कार्यक्रमाला अखिल भारतीय पूर्वसैनिक सेवा परिषदेचे महाराष्ट्र व गोवा प्रांताध्यक्ष एअर मार्शल प्रदीप बापट (नि.), श्री. उल्हास सावळे कर, एअर कमोडोर अरुण इनामदार यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment