निसान मोटर इंडियाचा महाराष्ट्रात नेटवर्कचा विस्तार, पुण्यात ऑल न्यू सिल्व्हर ज्युबिली निसान ३एस सुविधेचे उद्घाटन

निसान मोटर इंडियाचा महाराष्ट्रात नेटवर्कचा विस्तार, पुण्यात ऑल न्यू सिल्व्हर ज्युबिली निसान ३एस सुविधेचे उद्घाटन 

• सिल्व्ह्र ज्युबिली निसान ३एस सुविधेत ७००० चौ. फुटांचे शोरूम आणि ९००० चौ. फुटांचे अद्ययावत सर्व्हिस वर्कशॉप समाविष्ट आहे. त्यातून एकात्मिक सेवा, सर्व्हिस आणि सुट्या भागांचे पाठबळ मिळेल
• निसानच्या महाराष्ट्रातील नेटवर्कमध्ये २३ टचपॉइंट्सपर्यंत विस्तार झाला असून त्यातून या प्रदेशातील सहजसाध्यता आणि ग्राहकानुभवात भर पडेल. 
• या महिन्यात भारतभरातील ऐतिहासिक नेटवर्क विस्ताराचा भाग असलेले हे नवीन टचपॉइंट्स महाराष्ट्रातील ग्राहकांच्या वाढत्या मागणीला सेवा देतील.

पुणे, ७ एप्रिल २०२६: निसान मोटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने (एनएमआयपीएल) पुण्यात अत्याधुनिक सिल्व्हर ज्युबिली निसान ३ एसच्या सुविधेचे उद्घाटन करून महाराष्ट्रात आपला ठसा उमटवला आहे. हे उद्घाटन निसानची व्याप्ती वाढवण्यासाठी आणि भारतातील प्रमुख बाजारपेठांमध्ये अखंड विक्री आणि सेवा अनुभव देण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांशी सुसंगत आहे.

या सुविधेत १० गाड्यांची प्रदर्शन क्षमता असलेले ७००० चौरस मीटर क्षेत्रातील आधुनिक शोरूम आणि ९००० चौरस फूट क्षेत्रावर पसरलेली पूर्णपणे सुसज्ज सेवा कार्यशाळा यांचा समावेश आहे. येथे एकाच छताखाली वाहन विक्री, सेवा आणि सुटे भाग उपलब्ध होतील. निसानच्या जागतिक रिटेल मानकांच्या अनुषंगाने तयार केलेले अत्याधुनिक शोरूम उच्च दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज आहेत आणि वाहन खरेदीचा उत्कृष्ट अनुभव व अद्वितीय ग्राहक मूल्य देण्यासाठी वचनबद्ध असलेल्या जाणकार, सुशिक्षित आणि उत्साही विक्री आणि सेवा व्यावसायिकांद्वारे कार्यरत आहेत.

यावेळी बोलताना निसान मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ वत्स म्हणाले, "पुण्यात आमच्या ३ एस सुविधेच्या उद्घाटनासह महाराष्ट्रात आमची उपस्थिती बळकट करताना आम्हाला आनंद होत आहे. निसान ब्रँडच्या वाढीला चालना देताना या प्रदेशात ग्राहकांकडून जोरदार मागणी दिसून येत आहे. हा विस्तार आमच्या राष्ट्रव्यापी नेटवर्क विस्ताराचा एक अविभाज्य भाग आहे, जो आमच्या ग्राहकांजवळ जाण्याच्या आणि वाहनखरेदीचा उत्तम अनुभव देण्याच्या आमच्या वचनबद्धतेला बळकटी देतो. अलीकडेच सादर करण्यात आलेल्या निसान ग्रॅव्हाइटसह आम्ही आमच्या उत्पादनांच्या विक्रीला चालना देत आहोत. त्यामुळे नेटवर्क विस्तार हा आमच्या धोरणाचा मुख्य आधारस्तंभ आहे."

सिल्व्हर ज्युबिली निसानच्या मुख्य वितरक श्रीमती राजवर्धिनी जगताप म्हणाल्या, "महाराष्ट्रात ब्रँडची उपस्थिती वाढवण्यासाठी महाराष्ट्रात ही नवीन सुविधा सुरू करण्यासाठी निसान मोटर इंडियाशी भागीदारी करताना आम्हाला अभिमान वाटतो. निसानचा उत्तम उत्पादन पोर्टफोलिओ आणि ग्राहककेंद्री दृष्टिकोनाच्या पाठिंब्याने ग्राहकांना जागतिक दर्जाचा रिटेल आणि सेवा अनुभव प्रदान करण्याची आमची बांधिलकी या डीलरशिपमधून प्रतिबिंबित होते. आम्ही पुणे आणि आसपासच्या भागातील ग्राहकांना उत्तम दर्जाच्या विक्री आणि विक्रीनंतरच्या पाठिंब्यासह सेवा देण्यास उत्सुक आहोत."

निसान भारतीय बाजारपेठेत वेगाने विस्तार करत असल्याने ही वाढ एका महत्त्वपूर्ण वेळी झाली आहे. न्यू निसान मॅग्नाइटच्या सातत्यपूर्ण यशामुळे वाढीचा भक्कम पाया रचला गेला आहे, तर न्यू निसान ग्रॅव्हाइटमुळे मुख्य क्षेत्रांत ब्रँडची उपस्थिती आणखी मजबूत झाली आहे. 


या विस्तारासह निसान भारतीय ग्राहकांना अधिक मूल्य देण्याच्या उद्देशाने वितरक विकास आणि ग्राहककेंद्री उपक्रमांमध्ये निरंतर गुंतवणुकीच्या माध्यमातून भारतीय बाजारपेठेसाठी आपली दीर्घकालीन वचनबद्धता मजबूत करत आहे.


अधिक माहितीसाठी कृपया भेट द्या www.nissan.in

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

‘हात दाखवा कॅब थांबवा’ सीईओ कॅब्स चा उपक्रम**भारतातील पहिली "हायब्रिड" टॅक्सी सेवा- आता प्रवासी आणि चालक दोघांनाही मिळणार सन्मान आणि स्वातंत्र्य**शून्य कमिशन, प्रामाणिक भाडे आणि महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य