आगापे इन्स्टिट्यूट पुणे तर्फे पदवीदान सोहळा उत्साहात संपन्न
आगापे इन्स्टिट्यूट पुणे तर्फे पदवीदान सोहळा उत्साहात संपन्न
आगापे इन्स्टिट्यूट पुणे तर्फे पदवीदान सोहळा उत्साहात संपन्न झाला. आगापे इन्स्टिट्यूट तर्फे 24 विद्यार्थ्यांचा ईश्वरविज्ञान अभ्यासक्रमाचा पदवीदान कार्यक्रम कॅम्प येथे प्रिन्सिपॉल जोमन मॅथ्यूज व डॉ.डब्ल्यू एस ॲनी यांच्या हस्ते सोहळा पार पडला.यावेळी प्रमुख पाहुणे पास्टर रॉबिन महाडकर,
पास्टर.अनिल गडकरी सर, पास्टर राजेश केळकर, बिशप प्रदीप वाघमारे, इत्यादी उपस्थित होते. यावेळी जॉइल्स त्रिभुवन, संगीता आरसूड, अंजना गुरव, मारिया देठे यांना गुणवत्तेसाठी विशेष सन्मानित करण्यात आले. तसेच 84 व्या वर्षी रजनी साळवे यांनी अभ्यासक्रम पूर्ण करून आपले अष्टपैलूत्त्व सिद्ध केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पा. राजेश केळकर, यांनी केले तर आभार रजनी साळवे यांनी मानले.
Comments
Post a Comment