स्थूलता विरोधात नोबल हॉस्पिटलची जनजागृती मोहीम; रुग्णांच्या ‘ट्रान्सफॉर्मेशन’चा अनोखा फॅशन शो


स्थूलता विरोधात नोबल हॉस्पिटलची जनजागृती मोहीम; रुग्णांच्या ‘ट्रान्सफॉर्मेशन’चा अनोखा फॅशन शो

पुणे, १ एप्रिल २०२६ :

नोबल हॉस्पिटल्स अँड रिसर्च सेंटर च्या वतीने वजन कमी करून आयुष्याला नवे सकारात्मक वळण देणाऱ्या रुग्णांचा अनोखा ‘ट्रान्सफॉर्मेशन फॅशन शो’ आयोजित करण्यात आला. हा केवळ फॅशन शो नसून वाढलेल्या वजनाविरोधात जिद्द, चिकाटी आणि मनोबलाच्या जोरावर विजय मिळवलेल्या रुग्णांच्या आत्मविश्वासाचा प्रेरणादायी उत्सव ठरला. या प्रसंगी नोबल हॉस्पिटल्स अँड रिअर्च सेंटरचे समूह कार्यकारी अधिकारी डॉ. संजय पठारे, संचालक डॉ. पी.डी पोटे, रुग्णालयातील सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर ओबेसिटी,मेटाबोलिक डिसीजेस ॲन्ड ॲडव्हान्स्ड बेरियाट्रिक सायन्सेसच्या संचालिका डॉ रीमा काशिवा, बेरियाक्ट्रिक तज्ज्ञ डॉ. परमेश्वर भांबुर्डे आदी मान्यवर उपस्थित होते

या स्पर्धेत नोबल हॉस्पिटलच्या स्थूलता विभागात उपचार घेतलेल्या व उपचार सुरू असलेल्या 20 स्पर्धकांनी सहभाग घेतला. उत्कृष्ट वेशभूषा, मनोगत आणि रॅम्प वॉक या तीन विभागांत चार महिला आणि चार पुरुष स्पर्धकांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. विशेष म्हणजे, 30 ते 70 वयोगटातील आणि 90 किलो ते तब्बल 155 किलोपर्यंत वजन नियंत्रणात आणलेल्या स्पर्धकांचा सहभाग या स्पर्धेचे वैशिष्ट्य ठरले.

या कार्यक्रमासाठी पुलं पुणे लेडीज या संस्थापिका ' सोनिया कोनजेटी तसेच अभिनेत्री जानवी पाठक यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

डॉ. संजय पठारे म्हणाले, “नोबल हॉस्पिटलमध्ये केवळ आजारांवर उपचार न करता रुग्णांचे शारीरिक आणि मानसिक परिवर्तन घडवण्यावर भर दिला जातो. वजन कमी करणे हा अत्यंत कठीण प्रवास असला, तरी आजचा कार्यक्रम हा तो यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्यांच्या प्रयत्नांचा गौरव आहे.”

नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटर येथील सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर ओबेसिटी,मेटाबोलिक डिसीजेस ॲन्ड ॲडव्हान्स्ड बेरियाट्रिक सायन्सेसच्या संचालिका डॉ.रीमा काशिवा म्हणाल्या की, लठ्ठपणावर उपचार न केल्यास मधुमेह,उच्च रक्तदाब,हृदयरोग,चयापचयाचे विकार आणि इतर अनेक गुंतागुंत होऊ शकतात. लवकर निदान आणि शास्त्रीय उपचार हे या गुंतागुंतींची जोखीम लक्षणीयरित्या कमी करू शकतात आणि जीवनमान उंचावू शकतात.

परीक्षकांनीही स्पर्धकांच्या मेहनतीचे आणि जिद्दीचे कौतुक केले. तसेच स्पर्धकांनी आपला यशस्वी प्रवास घडवून आणण्यासाठी मार्गदर्शन करणारे स्थूलता तज्ज्ञ डॉ. परमेश्वर भांबुर्डे आणि डॉ.रिमा काशिवा यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

रुग्णालयाचे संचालक डॉ. पोटे यांनी स्थूलतेमुळे उद्भवणाऱ्या विविध आरोग्य समस्यांवर प्रकाश टाकला. वाढलेले वजन हाडांच्या सांगाड्यासह हृदयावर अतिरिक्त ताण निर्माण करते, ज्यामुळे उच्च रक्तदाब, हृदयरोग यांसारख्या आजारांचा धोका वाढतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमात स्पर्धकांना आपला अनुभव आणि संघर्ष मांडण्याची संधी देण्यात आली, ज्यामुळे उपस्थितांना प्रेरणादायी संदेश मिळाला.

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

‘हात दाखवा कॅब थांबवा’ सीईओ कॅब्स चा उपक्रम**भारतातील पहिली "हायब्रिड" टॅक्सी सेवा- आता प्रवासी आणि चालक दोघांनाही मिळणार सन्मान आणि स्वातंत्र्य**शून्य कमिशन, प्रामाणिक भाडे आणि महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य