पहिल्या ‘पिंपरी चिंचवड प्रिमीअर लीग’ महिलांच्या टी-२० क्रिकेट स्पर्धेचे २१ एप्रिलपासून आयोजन !!
पहिल्या ‘पिंपरी चिंचवड प्रिमीअर लीग’ महिलांच्या टी-२० क्रिकेट स्पर्धेचे २१ एप्रिलपासून आयोजन !!
पुणे, १८ एप्रिलः पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनच्यावतीने पहिल्या ‘पिंपरी चिंचवड प्रिमीअर लीग’ (पीसीपीएल) महिलांच्या टी-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा दि. २१ ते २५ एप्रिल या कालावधीत हिंजेवाडी येथील फोर स्टार क्रिकेट मैदानावर करण्यात आले आहे.
संघटनेचे अध्यक्ष जगदीश शेट्टी आणि सचिव राजू कोतवाल यांनी सांगितले की, महिलांसाठी पहिल्यांदाच पीसीपीएल टी-२० स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नायर ईगल्स्, ऑक्सिरिच, बंट्स वॉरीयर्स आणि ऐश्वर्यम चॅलेजंर्स हे चार संघ सहभागी होणार आहेत. साखळी आणि बाद फेरीमध्ये होणाऱ्या या महिलांच्या खुल्या स्पर्धेत एकूण ६० महिला खेळाडू सहभागी झाल्या आहेत.
विजेत्या संघाला ७५ हजार रूपय आणि करंडक तर, उपविजेत्या संघाला ५० हजार रूपये आणि करंडक मिळणार आहे. तृतीय क्रमांकाच्या संघाला २५ हजार रूपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय सर्वोत्कृष्ट बॅटर, गोलंदाज, क्षेत्ररक्षक यांना प्रत्येकी ५ हजार रूपयांचे पारितोषिक तसेच मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू याला ७ हजार रूपयांचे पारितोषिक मिळणार आहे. प्रत्येक सामन्यासाठी सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि फायटर ऑफ द मॅच अशी पारितोषिके देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
स्पर्धेचे उद्घाटन राज्याच्या विधान परिषद आमदार उमा गिरीष खापरे यांच्या हस्ते होणार असून स्पर्धेचा उद्घाटनाचा सामना बंट्स वॉरीयर्स आणि ऐश्वर्यम चॅलेजंर्स यांच्यात होणार आहे.
------
Comments
Post a Comment