पुण्यातील नोबल हॉस्पिटलने महाराष्ट्रातील पहिल्यावहिल्या, अत्यंत दुर्मिळ रोबोटिक हृदय शस्त्रक्रियेची यशस्वी कामगिरी करत इतिहास रचला
पुण्यातील नोबल हॉस्पिटलने महाराष्ट्रातील पहिल्यावहिल्या, अत्यंत दुर्मिळ रोबोटिक हृदय शस्त्रक्रियेची यशस्वी कामगिरी करत इतिहास रचला
—तसेच भारतातील दुसऱ्या अशा शस्त्रक्रियेची नोंद करत, पुण्यात रोबोटिक हृदय शस्त्रक्रिया करणारे पहिले रुग्णालय ठरले
पुणे, : हडपसर येथील नोबल हॉस्पिटल्स अँड रिसर्च सेंटरने रोबोटचा वापर करून कीहोल पोर्ट्सद्वारे संपूर्णपणे करण्यात येणारी 'रोबोटिक लेफ्ट एट्रियल मीक्झोमा एक्सिजन' ही गुंतागुंतीची हृदयातील गाठ काढण्याची शस्त्रक्रिया नुकतीच यशस्वीरित्या केली.हृदयविकार उपचार क्षेत्रात हे एक महत्वाचे यश आहे.
ही शस्त्रक्रिया एका ५५ वर्षीय महिलेवर करण्यात आली. नियमित तपासण्यांमध्ये त्यांच्या छातीच्या डाव्या कप्प्यात ट्युमर (गाठ)असल्याचे निदान झाले होते. अशा प्रकारच्या गाठींना लेफ्ट एट्रियल मीक्झोमा असे म्हणतात. ही सामान्यपणे आढळणारी आणि कर्करोगग्रस्त नसलेली गाठ (बेनाइन ट्युमर) असली तरी यामुळे रुग्णांना स्ट्रोक येणे किंवा धाप लागणे यासारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.अशा स्थितीत शस्त्रक्रियेद्वारे गाठ काढून टाकणे हा एकमेव उपचार पर्याय असतो.
पारंपरिकपणे, या शस्त्रक्रियेसाठी 'मीडियन स्टर्नोटॉमी' ची आवश्यकता असते, ज्यामध्ये छाती उघडण्यासाठी आणि ह्रदयापर्यंत पोहोचण्यासाठी छातीचे हाड कापावे लागते.नोबल हॉस्पिटलमध्ये प्रथमच, हीच प्रक्रिया रोबोटच्या साहाय्याने, केवळ लहान पोर्ट इन्सिजनद्वारे करण्यात आली. या प्रक्रियेत कोणताही मोठा छेद नाही, किंवा छातीचे हाड कापण्याची गरज भासली नाही. या प्रक्रियेत हार्ट लंग मशीनचा वापर करत हृदय थांबवण्यात आले. थ्रीडी कॅमेराच्या साह्याने हृदयाच्या डाव्या कप्प्यात जाऊन अचूकपणे ही गाठ काढण्यात आली .
रोबोटिक हृदय शस्त्रक्रियेचे रुग्णांना थेट अनेक फायदे मिळतात. त्यामध्ये कमीत कमी रक्तस्त्राव,शस्त्रक्रियेनंतर कमी वेदना, जलद पुनर्प्राप्ती आणि रुग्णालयात कमी कालावधी, छातीवर मोठ्या व्रणाऐवजी लहान व्रण अशा अनेक फायद्यांचा समावेश आहे. करण्यात आलेले छेद हे रोबोटच्या साह्याने टाके घालून बंद करण्यात आले.
हे हृदय शस्त्रक्रियेतील एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक पाऊल असून हृदय शल्यचिकित्सक डॉ. धैर्यशील कणसे यांच्या नेतृत्वाखाली, वरिष्ठ कर्करोग शल्यचिकित्सक डॉ. आशिष पोखरकर यांच्या सहकार्याने पार पडली. शस्त्रक्रिया करणाऱ्या टीममध्ये डॉ. अनिरुद्ध ढेकणे आणि डॉ. एन. जाधव यांचा समावेश होता. भूल देण्याचे काम डॉ. सम्राट मदनाईक आणि डॉ. परमिता दीक्षित यांनी केले.
ही प्रक्रिया भारतीय हृदयरोग शल्यचिकित्सकाने विकसित केलेल्या 'एसएसआय मंत्रा' या रोबोटिक प्रणालीचा वापर करून करण्यात आली. हे प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानातील भारताची वाढती क्षमता दर्शवते.
या यशामुळे अनेक हृदय रुग्णांसाठी नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. तज्ञांच्या मते, रोबोटिक तंत्रज्ञान लवकरच ट्यूमर काढण्यापलीकडे जाऊन रोबोटिक एएसडी क्लोजर, रोबोटिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट आणि रोबोटिक-असिस्टेड बायपास शस्त्रक्रियांपर्यंत विस्तारणार आहे. शस्त्रक्रियेतील कौशल्य जसजसे वाढेल, तसतशी ही पद्धत संपूर्ण भारतात आणि जागतिक स्तरावर वापरली जाऊ शकते, ज्यामुळे प्रगत हृदयसेवा कमी त्रासदायक आणि अधिक सुलभ होईल.
या यशाबद्दल बोलताना डॉ. कणसे म्हणाले की, हृदय शस्त्रक्रियेतील एका नव्या युगाची ही केवळ सुरुवात आहे, जिथे रुग्णांना कमीत कमी त्रासासह जागतिक दर्जाचे परिणाम मिळतील.
नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटरचे समूह कार्यकारी अधिकारी डॉ.संजय पठारे म्हणाले की, हा महत्वाचा टप्पा आपल्या शहरातील हृदयविकार उपचार क्षेत्रासाठी एक महत्त्वपूर्ण प्रगती दर्शवतो. रोबोटिकच्या साहाय्याने केलेली शस्त्रक्रिया अधिक अचूकता देतेच, पण त्याचबरोबर रुग्णांना जलद बरे होणे, कमी वेदना आणि उत्तम वैद्यकीय परिणाम शक्य करते. आरोग्यसेवेचे नवे मापदंड स्थापित करण्यासाठी आम्ही अत्याधुनिक वैद्यकीय नवकल्पना आणि कुशल मनुष्यबळामध्ये सातत्याने गुंतवणूक करत राहू.
डॉक्टरांच्या टीमचे अभिनंदन करताना, 'नोबल हॉस्पिटल्स अँड रिसर्च सेंटर'चे उपव्यवस्थापकीय संचालक डॉ. दिविज माने म्हणाले की, अशा प्रकारच्या प्रगतीमुळे या हृदयविकारावरील उपचारांची गुणवत्ता लक्षणीयरीत्या उंचावेल आणि प्रगत रोबोटिक हृदयशस्त्रक्रियेच्या क्षेत्रातील क्षमता अधिक बळकट होईल. रुग्णांना सर्वोत्तम परिणाम मिळवून देण्यासाठी, रुग्ण-केंद्रित आणि तंत्रज्ञान-आधारित आरोग्यसेवेसाठी नवीन परिसीमा ओलांडत आम्ही आणखी प्रगत उपचारांच्या दिशेने वाटचाल करत राहू .
डॉ. दिविज माने म्हणाले की, आज पुणे अत्याधुनिक हृदयरोग उपचारांसाठी जागतिक स्तरावर आपले स्थान निर्माण करत आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तज्ज्ञ शल्यचिकित्सकांद्वारे,या क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केली जाणारी अत्याधुनिक रोबोटिक हृदय शस्त्रक्रिया येथेच यशस्वीरीत्या केली जाऊ शकते आणि त्याचे परिणाम जगातील सर्वोत्तम केंद्रांच्या बरोबरीचे आहेत, हे आज आमच्या टीमने दर्शविले आहे.अद्ययावत उपचारांसाठी रुग्णांनी देशाबाहेर जाण्याची गरज नाही; ते अद्ययावत व सर्वोत्कृष्ट उपचार त्यांच्या पर्यंत पोहोचवण्याची आमची वचनबद्धता आहे. हा टप्पा आमच्या ठाम निर्धाराचे प्रतीक आहे. वैद्यकीयदृष्ट्या काय साध्य करणे शक्य आहे, यासाठी सीमा आम्ही सातत्याने विस्तारत राहू. तंत्रज्ञान आणि कौशल्यात अविरत गुंतवणूक करू आणि रुग्ण-केंद्रित, परिणाम-आधारित हृदयरोग उपचारांसाठी नवे मापदंड स्थापित करू.प्रगत हृदय शस्त्रक्रियेसाठी एक प्रमुख केंद्र म्हणून जगाचे लक्ष आता अधिकाधिक पुण्याकडे वळेल, आणि त्या चळवळीचे नेतृत्व करण्याचा आमचा निर्धार आहे.
नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.दिलीप माने म्हणाले की, आमच्या हॉस्पिटलमध्ये रोबोटिक हृदय शस्त्रक्रियेची सुरुवात ही तंत्रज्ञान आणि वैद्यकीय उत्कृष्टतेप्रति आमची वचनबद्धता दर्शवते. ही महत्त्वपूर्ण कामगिरी योग्य नियोजन, जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांमुळे आणि आमच्या कुशल बहुशाखीय टीमच्या समर्पणामुळे साध्य झाली आहे.
Comments
Post a Comment