मालाबार गोल्ड अँड डायमंड्सने नोंदवली आजवरची सर्वोत्तम अक्षय तृतीया;

मालाबार गोल्ड अँड डायमंड्सने नोंदवली आजवरची सर्वोत्तम अक्षय तृतीया;

गुणवत्ता-आधारित वाढ आणि जबाबदार ज्वेलर पद्धतींमुळे बाजारातील नेतृत्व अधिक बळकट

ठळक वैशिष्ट्ये:

· ही सर्वकालीन सर्वोत्तम अक्षय तृतीया; ~53% वार्षिक वाढ, 2,646 कोटी रु. ची विक्री

· भारत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये 1.25 लाखांहून अधिक ग्राहक

· स्टडेड ज्वेलरीमध्ये 45% वाढ; नव्या ग्राहकांचा वाढता वाटा

· एकात्मिक उत्पादनामुळे ग्राहकांना किंमतीत फायदा आणि डिझाइनची विविधता

 

मुंबई, 28 एप्रिल 2026: जगातील अग्रगण्य दागिने विक्रेत्यांपैकी एक आणि जबाबदारी व विश्वासाचे प्रतीक असलेला ब्रँड मालाबार गोल्ड अँड डायमंड्सने मजबूत ग्राहक मागणी, उत्कृष्ट ग्राहक सहभाग आणि कंपनीच्या एकात्मिक उत्पादन क्षमतेच्या आधारावर आतापर्यंतची सर्वात दमदार अक्षय तृतीया कामगिरी नोंदवली आहे.

 

कंपनीने अक्षय तृतीया दरम्यान जागतिक स्तरावर ~53% वार्षिक वाढ नोंदवली. एकूण विक्री 2,646 कोटी रु. पर्यंत पोहोचली. यात भारतात 71% वाढ आणि इतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये 22% वाढ नोंदवली गेली. यातून विविध भौगोलिक क्षेत्रांमध्ये वाढीचा सातत्यपूर्ण वेग दिसून येतो.

 

या कामगिरीबद्दल भाष्य करताना मालाबार ग्रुपचे अध्यक्ष श्री. एम. पी. अहमद म्हणाले, “अक्षय तृतीया हा आमच्या ग्राहकांसाठी महत्त्वाचा सण राहिला आहे आणि यावर्षीची कामगिरी ही मजबूत मागणी तसेच सखोल ग्राहक सहभाग याचे प्रतिबिंब आहे. जागतिक स्तरावर भारत आणि इतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये सुमारे 53% झालेली वार्षिक मजबूत वाढच नव्हे, तर त्या वाढीची गुणवत्ता ही विशेषत्वाने लक्षात येणारी बाब आहे. या वाढीच्या केंद्रस्थानी ग्राहकांचा आमच्यावर जबाबदार ज्वेलर म्हणून असलेला विश्वास आहे. पारदर्शक किंमत रचना, नैतिक पद्धतीने मिळवलेले सोने आणि हिरे, कठोर गुणवत्ता मानके आणि ‘ग्राहक प्रथम’ दृष्टिकोन यावरील आमची बांधिलकी सातत्याने प्रभावी ठरत आहे. या गोष्टींकडे लक्ष केंद्रित केल्यामुळे आम्हाला ग्राहकांशी अधिक सखोल नाते निर्माण करता आले आणि विविध बाजारपेठांमध्ये सातत्यपूर्ण पसंती मिळाली.”

 

कंपनीने विविध बाजारपेठांमध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी 1.25 लाखांहून अधिक ग्राहकांशी संवाद साधला. लग्नसराईनिमित्त झालेली खरेदी आणि तरुण तसेच प्रथमच खरेदी करणाऱ्या ग्राहकांचा यात वाढता सहभाग होता. विशेष म्हणजे, स्टडेड ज्वेलरी विभागात 45% वाढ नोंदवली गेली. त्यातून डिझाइन-आधारित आणि मूल्यवर्धित उत्पादनांकडे असलेला स्पष्ट कल दिसून येतो.भारत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये कामगिरी मजबूत राहिली आणि त्यायोगे ही कंपनीची आतापर्यतची सर्वोत्तम अक्षय तृतीया ठरली. एकूण विक्री 2,646 कोटी रु. पर्यंत पोहोचली. विविध विभाग आणि भौगोलिक क्षेत्रांमधील मागणीची व्याप्ती यातून दिसून आली.

 

कंपनीच्या उत्पादन-आधारित फायद्यामुळे वाढ व्यापक बाजारपेठीय प्रवाहांपेक्षा अधिक राहिली. कंपनीचे एकात्मिक मॉडेल स्पर्धात्मक किंमतीत डिझाइन्स उपलब्ध करून देण्यास सक्षम असून मोठ्या प्रमाणावर सातत्यपूर्ण गुणवत्ता राखते. यामुळे बदलत्या मागणीला प्रतिसाद देणे शक्य होतानाच विविध बाजारपेठांमध्ये डिझाइन पोझिशनिंग आणि ग्राहकांची पसंती वाढत आहे.

 

कंपनी पुढे विस्तार करत असताना तिचा भर ग्राहकांचा विश्वास अधिक मजबूत करणे, उत्पादन पोर्टफोलिओचा विस्तार करणे आणि पारदर्शकता, गुणवत्ता व जबाबदार व्यावसायिक पद्धतींवर आधारित सातत्यपूर्ण व शाश्वत विकास साध्य करणे यावर राहणार आहे.

 

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

‘हात दाखवा कॅब थांबवा’ सीईओ कॅब्स चा उपक्रम**भारतातील पहिली "हायब्रिड" टॅक्सी सेवा- आता प्रवासी आणि चालक दोघांनाही मिळणार सन्मान आणि स्वातंत्र्य**शून्य कमिशन, प्रामाणिक भाडे आणि महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य