मोठ्या भांडवलापेक्षा मोठ्या विचारांची गरज*कल्याणी फोर्ज च्या कार्यकारी अध्यक्षा रोहिणी कल्याणी यांचे मत ; वीरशैव लिंगायत ग्लोबल ऑर्गनायझेशन आयोजित एलबीएन एक्स्पो २०२६ या प्रदर्शनात तरुण व्यावसायिकांचा सन्मान


*मोठ्या भांडवलापेक्षा मोठ्या विचारांची गरज*
कल्याणी फोर्ज च्या कार्यकारी अध्यक्षा रोहिणी कल्याणी यांचे मत ; वीरशैव लिंगायत ग्लोबल ऑर्गनायझेशन आयोजित एलबीएन एक्स्पो २०२६ या प्रदर्शनात तरुण व्यावसायिकांचा सन्मान
 
पुणे : विकसित भारत ही केवळ सरकारची नाही, तर आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. तरुणांना व्यवसायात आणण्यासाठी लहान-मोठ्या उद्योजकांनी त्यांना मदत करणे आवश्यक आहे. स्टार्टअप उभारण्यासाठी तांत्रिक ज्ञान, योग्य दृष्टीकोन आणि मेहनत करण्याची तयारी असणे गरजेचे आहेच. पण त्याबरोबर मोठ्या भांडवलाची नव्हे, तर मोठ्या विचारांची आवश्यकता असते. आपण कोणत्या परिस्थितीतून आलो यापेक्षा आपण कोणत्या दिशेने चाललो आहोत आणि किती जिद्दीने प्रयत्न करीत आहोत, हे अधिक महत्त्वाचे आहे, असे मत कल्याणी फोर्ज च्या कार्यकारी अध्यक्षा रोहिणी कल्याणी यांनी व्यक्त केले.

वीरशैव लिंगायत ग्लोबल ऑर्गनायझेशन आयोजित लिंगायत बिजनेस नेटवर्क, एक्स्पो २०२६ या प्रदर्शनाचे आयोजन गणेश कला क्रीडा मंच येथे करण्यात आले होते. यावेळी www.vlgo.org या वेबसाईट चे अनावरण करण्यात आले. तसेच प्रदर्शनात तरुण व्यावसायिक व विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. चित्रपट दिग्दर्शक शिवराज वायचळ, मराठवाडा युवा मंचचे अध्यक्ष सत्यजीत चौधरी आणि राॅयल टुरिझमच्या राजश्री खडके देशमाने यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उद्योजक रवि डोल्ली, महेश मुद्दा व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

प्रदर्शनाचे उद्घाटन दि. विश्वेश्वर सहकारी बँक लि. पुणे अध्यक्ष अनिल गाडवे, उद्योजक अजय मुंगडे यांच्या हस्ते झाले. प्रदर्शनात १२० स्टॉल चा समावेश होता. प्रदर्शनात व्यावसायिक, शैक्षणिक आणि शेतीविषयक, तर खाद्य पदार्थांचे आयोजन करण्यात आले होते.

रवि डोल्ली म्हणाले, वीरशैव लिंगायत ग्लोबल ऑर्गनायझेशन आयोजित एलबीएन एक्स्पो म्हणजे विकसीत भारताचे स्वप्न पूर्ण करणारे प्रदर्शन आहे. या प्रदर्शनात केवळ तरुण पिढी नाही तर एका शाळकरी मुलीचा देखील स्टाॅल दिसला यावरून उद्याचा भारत कसा असेल हे दिसत आहे, असेही त्यांनी सांगितले.

महेश मुद्दा म्हणाले, तरुणांनी प्रामाणिकपणा, जिद्द, चिकाटी आणि सातत्य ठेवले तर नक्कीच यश संपादन करू शकतील. या प्रदर्शनातून जुन्या पिढीकडून मार्गदर्शन मिळालेच पण नव्या पिढीकडून नव्या गोष्टी शिकण्याची संधी मिळाली, असेही त्यांनी सांगितले.

लिंगायत एक्सपो मध्ये www.vlgo.org या वेबसाईट वरती रजिस्टर होण्याचे सर्व समाजासाठी आव्हान करण्यात आले. विश्वेश्वर बँकेकडून विशेष कर्ज योजना करण्याचे आश्वासन देण्यात आले. दिवसभरात एक्सपोला इंटरनॅशनल लिंगायत युथ फोरम चे अध्यक्ष संतोष केंचंबा, आरोग्यदुत मंगेश चिवटे ,तसेच आयुष्यमान भारत चे अध्यक्ष ओमप्रकाश शेटे आदिंनी भेट दिली. एक्सपो यशस्वी होण्यासाठी वीरशैव लिंगायत ग्लोबल ऑर्गनायझेशन च्या वतीने युवराज गाडवे, रवींद्र महाजन ,संतोष बनाळे, योगेश मेणकर, अमित हापसे, अतुल साखरपे, अविनाश बारजिभे, सचिन चिरमे, हेमंत गुडे. यांनी तसेच लिंगायत बिझनेस नेटवर्क टीम यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

‘हात दाखवा कॅब थांबवा’ सीईओ कॅब्स चा उपक्रम**भारतातील पहिली "हायब्रिड" टॅक्सी सेवा- आता प्रवासी आणि चालक दोघांनाही मिळणार सन्मान आणि स्वातंत्र्य**शून्य कमिशन, प्रामाणिक भाडे आणि महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य