कोकणस्थ परिवार ,

कोकणस्थ परिवार ,पुणे यांचे वतीने आज गुरुवार दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी फर्ग्युसन महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी संघाचे फिफा होम सभागृह पुणे. येथे स्वर्गीय भाई नेवरेकर जीवन गौरव पुरस्कार समारंभ अत्यंत उत्साहात पार पडला.
 पुरस्कारार्थी माननीय वस्ताद बुवाजी लिमन यांना वर्ल्ड वाईल्ड बुक रेकॉर्डचे मानकरी मा. भगवानदास सुगंधी यांचे हस्ते श्री. प्रकाश रेणुसे यांचे प्रमुख उपस्थितीत गौरविण्यात आले. अध्यक्ष ॲड. विजय सावंत होते. सुनील नेवरेकर यांनी प्रास्ताविक केले तर प्राध्यापक कुशाबा पिंगळे यांनी पुरस्कारार्थी व प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. श्रीनाथ हगवणे यांनी स्वागत केले. तर नरेश पेडणेकर यांनी उपस्थित यांचे आभार मानले.पराग गानू यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले यावेळी सौ.सुमन बुवाजी लिमन यांचाही खास सत्कार सौ.सोनिया नेवरेकर यांच्या हस्ते करण्यात आला. पवन नेवरेकर, श्री.गणेश निकम, आनंद पवार ,सिया मयेकर,अंकुश चौगुले आदींनी कार्यक्रमाचे यशस्वीते साठी विशेष परिश्रम घेतले
"*तालमीत कुस्ती आणि बाहेर दोस्ती* असे प्रतिपादन या प्रसंगी बुवाजी लिमन यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

‘हात दाखवा कॅब थांबवा’ सीईओ कॅब्स चा उपक्रम**भारतातील पहिली "हायब्रिड" टॅक्सी सेवा- आता प्रवासी आणि चालक दोघांनाही मिळणार सन्मान आणि स्वातंत्र्य**शून्य कमिशन, प्रामाणिक भाडे आणि महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य