पुणे ऑब्स्टेट्रिक अँड गायनॅकोलॉजिकल सोसायटीची नवीन कार्यकारिणी* ४१व्या इन्स्टॉलेशन सीएमईचा भव्य सोहळा संपन्न


पुणे ऑब्स्टेट्रिक अँड गायनॅकोलॉजिकल सोसायटीची नवीन कार्यकारिणी
* ४१व्या इन्स्टॉलेशन सीएमईचा भव्य सोहळा संपन्न

पुणे, २१ एप्रिल २०२६: पुणे ऑब्स्टेट्रिक अँड गायनॅकोलॉजिकल सोसायटी (पीओजीएस) च्या ४१व्या इन्स्टॉलेशन सीएमईचा भव्य सोहळा नुकताच अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर पार पडला. याप्रसंगी नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ पार पडला. प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ व बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या माजी विभागप्रमुख डॉ. उमा वानखेडे यांनी पीओजीएसच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली. त्यांच्यासोबतच नामांकित स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. चारुलता बापये यांनी सचिवपद स्वीकारले. नवीन कार्यकारिणी मध्ये डॉ. वैजयंती पटवर्धन (उपाध्यक्ष), डॉ. मीनाक्षी देशपांडे (कार्यकारी उपाध्यक्ष), डॉ. अर्चना पुंगलिया (क्लिनिकल सेक्रेटरी) आणि डॉ. अमोल लुंकड (खजिनदार) यांचा समावेश आहे.

 या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, विशेष अतिथी द फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिक ॲन्ड गायनेकोलॉजिकल सोसायटीज ऑफ इंडिया (फॉग्सी) चे अध्यक्ष डॉ. भास्कर पाल आणि एएमओजीएस चे अध्यक्ष डॉ. अमेय पुरंदरे आदी मान्यवर उपस्थित होते. याबरोबरच पुणे शहरातील सर्व माजी अध्यक्ष आणि नामवंत स्त्रीरोगतज्ज्ञ उपस्थित होते.

याच सोहळ्याच्या निमित्ताने प्रगती २०२६ - स्टे करंट, स्टे अहेड या ज्ञानवर्धक शैक्षणिक परिषदेचेही उद्घाटन करण्यात आले. या परिषदेत विविध चर्चासत्रे, विचारप्रवर्तक वादविवाद सत्रे, दैनंदिन क्लिनिकल प्रॅक्टिससाठी मार्गदर्शन, प्राध्यापक अंजनेयुलू ओरेशन आणि डॉ. ए. व्ही. उमराणीकर ओरेशन यांचा समावेश होता.

हा सोहळा केवळ पदग्रहणाचा नव्हता, तर स्त्रीआरोग्य सेवेत सातत्याने उत्कृष्टता साध्य करण्याचा, नव्या विचारांना स्वीकारण्याचा आणि रुग्णसेवेत अधिक संवेदनशील व अद्ययावत राहण्याचा एक सामूहिक संकल्प होता. पीओजीएस ही संस्था पुढील काळातही शिक्षण, संशोधन आणि सामाजिक बांधिलकी यांचा समतोल साधत स्त्रीआरोग्य क्षेत्रात मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास या प्रसंगी व्यक्त करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

‘हात दाखवा कॅब थांबवा’ सीईओ कॅब्स चा उपक्रम**भारतातील पहिली "हायब्रिड" टॅक्सी सेवा- आता प्रवासी आणि चालक दोघांनाही मिळणार सन्मान आणि स्वातंत्र्य**शून्य कमिशन, प्रामाणिक भाडे आणि महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य