चेहरे 'चित्र प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद शिक्षण प्रसारक मंडळीच्या नूमवि प्रशालेचे चित्रकला विभाग प्रमुख दत्तात्रय वेताळ यांच्या 'चेहरे' या पेन्सिल व्यक्तीचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन नुकतेच झाले . या प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ . संजय कंदलगावकर यांच्या हस्ते झाले .यावेळी चित्रकार केदारनाथ भागवत , प्रा .मीना कारंजेकर,निलेश इथापे ,मयुरी साळवी ,स्वप्नील शेटे उपस्थित होते.

 - 'चेहरे 'चित्र प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
       शिक्षण प्रसारक मंडळीच्या नूमवि प्रशालेचे चित्रकला विभाग प्रमुख दत्तात्रय वेताळ यांच्या 'चेहरे' या पेन्सिल व्यक्तीचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन नुकतेच झाले . या प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ . संजय कंदलगावकर यांच्या हस्ते झाले .यावेळी चित्रकार केदारनाथ भागवत , प्रा .मीना कारंजेकर,निलेश इथापे ,मयुरी साळवी ,स्वप्नील शेटे उपस्थित होते.
      " कलाक्षेत्र व शालेय विद्यार्थी तसेच कलारसिकांना सुद्धा या चित्र प्रदर्शनातून एक उच्च दर्जाच्या चित्रकलेच्या अभिरुचीचा आस्वाद घेता येईल ." असे ज्येष्ठ शिक्षण तज्ञ डॉ . कंदलगावकर यांनी प्रतिपादन केले .
         वेताळ यांनी आजपर्यंत हजारो पेन्सिल व्यक्तिचित्रे रेखाटली आहेत. ते दररोज एक व्यक्तिचित्र रेखाटतात. त्यांचा हा उपक्रम अनेक वर्ष सुरू असून कलारसिकांना या चित्रप्रदर्शनातून उत्कृष्ट चित्रे पाहायला मिळणार आहेत . 
        मुंबई ,पुणे ,कोल्हापूर येथील वेताळ यांच्या चित्रप्रदर्शनांना कला रसिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद लाभला आहे . . 
      हे चित्रप्रदर्शन कोथरूड येथील पू .ना . गाडगीळ अँड सन्स कलादालनात रविवार पर्यंत दि . 3 मे सकाळी 11 ते 8 वाजेपर्यंत खुले राहील . सौ . वंदना वेताळ यांनी सूत्रसंचालन केले . तेजस वेताळ यांनी आभार मानले .

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

‘हात दाखवा कॅब थांबवा’ सीईओ कॅब्स चा उपक्रम**भारतातील पहिली "हायब्रिड" टॅक्सी सेवा- आता प्रवासी आणि चालक दोघांनाही मिळणार सन्मान आणि स्वातंत्र्य**शून्य कमिशन, प्रामाणिक भाडे आणि महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य