सुजित कदम यांना ‘रंगत-संगत’चा काव्य प्रतिभा पुरस्कार
सुजित कदम यांना ‘रंगत-संगत’चा काव्य प्रतिभा पुरस्कार
पुणे : रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे कवी सुजित कदम यांचा काव्य प्रतिभा पुरस्काराने गौरव केला जाणार आहे. पुरस्कार वितरण समारंभ रविवार, दि. ३ मे २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता अक्षरवेल सभागृह, रामबाग कॉलनी, सदाशिव पेठ येथे आयोजित करण्यात आला आहे. पुरस्काराचे वितरण प्रसिद्ध कथाकार, साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासणे यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. शाल, श्रीफळ, ग्रंथभेट असे पुरस्काराचे स्वरूप आहे. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले असून यात भारती पांडे, मीरा शिंदे, प्रभा सोनवणे, तनुजा चव्हाण, स्वप्नील पोरे, डॉ. मृणालिनी गायकवाड, विजय सातपुते, योगेश काळे, नचिकेत जोशी, मृणाल जैन, कैतकी देशपांडे, संजय माने, प्रांजला धडफळे यांचा सहभाग आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
Comments
Post a Comment