पहिल्या पुना क्लब डेक्कन जिमखाना सुपर क्रिकेट लीग स्पर्धेत पँथर्स, टिप्सि टायटन्स, सेलर्स, जेट्स संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश



पहिल्या पुना क्लब डेक्कन जिमखाना सुपर क्रिकेट लीग स्पर्धेत पँथर्स, टिप्सि टायटन्स, सेलर्स, जेट्स संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश 

पुणे, 26 एप्रिल 2026: पुना क्लब लिमिटेड व डेक्कन जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या पुना क्लब डेक्कन जिमखाना सुपर क्रिकेट लीग स्पर्धेत पँथर्स, टिप्सि टायटन्स, सेलर्स, जेट्स या संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला.

पुना क्लब येथील क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत गौरव चाफळकर नाबाद 42 धावांच्या जोरावर पँथर्स संघाने स्नोलेपर्डस संघाचा 22 धावांनी पराभव केला. दुसऱ्या सामन्यात धर्मवीरसिंह जडेजा(2-3 व नाबाद 41) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर जेट्स संघाने ऍक्वा रायडर्ससंघाचा 8 गडी राखून पराभव केला. 

अन्य लढतीत अमेय श्रीखंडे(4-7) याने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर टिप्सि टायटन्स संघाने ओबेरॉय अँड नील किंग्ज संघाचा 7 गडी राखून पराभव करून उपांत्य फेरी गाठली. सिद्धांत धर्मा नाबाद 31 धावांच्या जोरावर सेलर्स संघाने पिर्थवी लायन्स संघाचा 8 धावांनी पराभव करून आगेकूच केली. 

निकाल: साखळी फेरी: 
पँथर्स: 6षटकात 4बाद 90धावा(गौरव चाफळकर नाबाद 42(17,5×6), अजिंक्य मेहता 17, केतन धुमाळ 2-6) वि.वि.स्नोलेपर्डस: 6षटकात 5बाद 68धावा(केतन धुमाळ 37(15,5×6), प्रतीक वैद्य 12, हिरेन अगरवाल 10, रोहित बर्वे 2-4, समीर कोल्हटकर 2-4); सामनावीर - गौरव चाफळकर; पँथर्स 22धावांनी विजयी;

ऍक्वा रायडर्स: 6षटकात 4बाद 78धावा(संदीप कानिटकर 29, शैलेश बंगाले 26, धर्मवीरसिंह जडेजा 2-3, पुनीत सामंत 1-8) पराभूत वि. जेट्स: 3.5षटकात 1बाद 79धावा(धर्मवीरसिंह जडेजा नाबाद 41(9,1×4,6×6), चिराग लुल्ला नाबाद 22, संदीप कानिटकर 1-20); सामनावीर - धर्मवीरसिंह जडेजा; जेट्स 8 गडी राखून विजयी;

ओबेरॉय अँड नील किंग्ज: 6षटकात 7बाद 73धावा(आधीश शहा 30, जमीर 30, अमेय श्रीखंडे 4-7, पार्थ चिवटे 2-6) पराभूत वि. टिप्सि टायटन्स: 4.4षटकात 2बाद 77धावा(अंकुश जाधव नाबाद 26, प्रसाद जाधव 25, अमेय सोमण नाबाद 20, आधीश शहा 1-12); सामनावीर - अमेय श्रीखंडे; टिप्सि टायटन्स 7गडी राखून विजयी 

सेलर्स: 6षटकात 2बाद 84धावा(सिद्धांत धर्मा नाबाद 31(14,2×4,3×6), आर्यन कीर्तने नाबाद 23, मनप्रीत उप्पल 14, रौनक ढोले पाटील 12, क्रिश शहा 1-6)वि.वि.पिर्थवी लायन्स: 6षटकात 3बाद 76धावा(क्रिश शहा नाबाद 30, आरव वीज 18, देवांग ढोले पाटील 2-20); सामनावीर - सिद्धांत धर्मा; सेलर्स 8 धावांनी विजयी.











Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

‘हात दाखवा कॅब थांबवा’ सीईओ कॅब्स चा उपक्रम**भारतातील पहिली "हायब्रिड" टॅक्सी सेवा- आता प्रवासी आणि चालक दोघांनाही मिळणार सन्मान आणि स्वातंत्र्य**शून्य कमिशन, प्रामाणिक भाडे आणि महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य