मेडट्रॉनिककडून भारतातील पार्किन्सन आजाराने पीडित रुग्णांसाठी ॲडप्टिव्ह डीप ब्रेन स्टिम्युलेशन सिस्‍टम लाँच


 मेडट्रॉनिककडून भारतातील पार्किन्सन आजाराने पीडित रुग्णांसाठी ॲडप्टिव्ह डीप ब्रेन स्टिम्युलेशन सिस्‍टम लाँच

नवी दिल्ली, २३ एप्रिल २०२६: मेडट्रॉनिक या आरोग्‍यसेवा तंत्रज्ञानातील जागतिक आघाडीच्‍या कंपनीने आज भारतात ॲडप्टिव्ह डीप ब्रेन स्टिम्युलेशन (एडीबीएस) यंत्रणेच्‍या लाँचची घोषणा केली आहे. समकालीन डीबीएस यंत्रणेमध्‍ये केलेली ही एक नाविन्यपूर्ण सुधारणा आहे, जेथे, पार्किन्सन आजाराने पीडित असलेल्या रुग्णांच्या जीवनाचा दर्जा अधिक सुधारणे हा यामागचा उद्देश आहे.

पार्किन्सन हा एक प्रगत मज्जासंस्थेशी संबंधित आजार आहे, जो व्यक्तीच्या हालचालींवर आणि दैनंदिन कामकाजावर परिणाम करू शकतो. काळासह यामुळे चालणे, लिहिणे किंवा दैनंदिन वस्तू पकडणे यांसारख्या सामान्य कृती करणे अधिक कठीण होऊ शकतात. हालचालींशी संबंधित आव्हाने ही सर्वात स्पष्टपणे दिसून येत असली, तरी हा आजार संवाद साधणे, झोप आणि एकूणच स्वास्थ्यासारख्या दैनंदिन जीवनाच्या इतर पैलूंवरही परिणाम करू शकतो. आजच्या काळात, या आजाराची लक्षणे व्यवस्थापित करण्यासाठी विविध उपचार पद्धती उपलब्ध आहेत. स्‍पेशालिस्‍ट्सद्वारे रुग्णाची वैयक्तिक गरज आणि वैद्यकीय मूल्यमापन लक्षात घेऊन या उपचार पद्धतींमध्ये काळानुसार बदल केले जातात.

डीप ब्रेन स्टिम्युलेशन सारखे उपचार पर्याय सध्या उपलब्ध आहेत, ज्यामध्ये दिवसभरात स्टिम्युलेशन लेव्हल्सचे मॅन्युअल समायोजन करावे लागते. हे सहसा रुग्ण किंवा त्यांच्या केअरगिव्‍हर्सना करावे लागते. मेडट्रॉनिकचे एडीबीएस तंत्रज्ञान रुग्णाची प्रकृती किंवा औषधांच्या गरजेनुसार रिअल-टाइममध्ये बदल घडवून आणण्यासाठी डिझाइन केले आहे, ज्यामुळे लक्षणांचे अधिक सातत्यपूर्ण व्यवस्थापन होण्यास मदत होते. या एडीबीएस यंत्रणेमध्‍ये ब्रेन सेन्स तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे, ज्याला अमेरिकेच्या अन्‍न व औषध प्रशासनाने (एफडीए) मान्यता दिली आहे.

ॲडप्टिव्ह डीप ब्रेन स्टिम्युलेशन (एडीबीएस) हे मेंदूतील सिग्नल्स किंवा रुग्णाच्या हालचालींमधील बदलांनुसार आपोआप उपचार बदलण्यासाठी डिझाइन केले आहे. रिअल-टाइममध्ये प्रतिसाद देऊन लक्षणांवर अधिक सातत्यपूर्ण नियंत्रण मिळवणे, दुष्परिणाम कमी करणे आणि शरीरात बसवलेल्या डिवाईसच्या बॅटरीचे आयुष्य वाढवणे, हे या यंत्रणेचे उद्दिष्ट आहे.

भारतात पार्किन्सन आजाराच्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा असताना—आणि पुढील पाच वर्षांत ही संख्या जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकावर पोहोचण्याचा अंदाज असताना—'एडीबीएस ' प्रणालीची ओळख अत्यंत निर्णायक वेळी झाली आहे. जरी सध्या पार्किन्सनसारख्या आजारांवर कोणताही पूर्ण उपचार उपलब्ध नसला, तरी 'डीप ब्रेन स्टिम्युलेशन' (डीबीएस) गेल्या तीन दशकांहून अधिक काळापासून पार्किन्सन आणि इतर मज्जासंस्थेशी संबंधित विकारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांचे जीवन आमूलाग्र बदलून टाकत आहे.

डीबीएसमध्ये छातीच्या त्वचेखाली पेसमेकरसारखे एक छोटे डिवाईस बसवले जाते, जे मेंदूच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणाऱ्या भागाला इलेक्ट्रॉनिक सिग्नल पाठवते. रुग्णाला आराम देण्यासाठी हे सिग्नल संदेशांना रोखतात, ज्यामुळे पार्किन्सनची हालचालींशी संबंधित लक्षणे निर्माण होतात.

या प्रसंगी मेडट्रॉनिक इंडियाच्या न्यूरोसायन्स अँड स्पेशालिटी थेरपीजचे सीनियर डायरेक्‍टर प्रतीक तिवारी म्हणाले, "भारतात पार्किन्सन आजार वाढती आरोग्य समस्या बनत आहेत, ज्‍यामुळे आम्‍हाला हे प्रगत तंत्रज्ञान येथे लाँच करताना अत्यंत अभिमान वाटत आहे. वेदना कमी करणे, आरोग्य उत्तम ठेवणे आणि आयुष्य वाढवणे हे आमचे नेहमीच ध्येय राहिले आहे आणि या यंत्रणेच्‍या सादरीकरणामधून त्या मोहिमेप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. हा टप्पा पार्किन्सन आजाराचा वाढता भार कमी करण्यातील आमच्‍या समर्पिततेची पुष्टी देतो, तसेच भारतातील रुग्णांचे जीवनमान सुधारण्यासाठी अत्याधुनिक आरोग्य तंत्रज्ञान आणण्यामधील आमचे नेतृत्व देखील प्रबळ करतो."

पार्किन्सनसारख्या आजाराचा भार जसजसा वाढत जाईल, तसतसे—अधिक चांगल्या उपचारांची उपलब्धता वाढवण्यासाठी, वैद्यकीय तज्ज्ञांना सखोल अंतर्दृष्टीद्वारे साहाय्य करण्यासाठी आणि अंतिमतः देशभरातील रुग्णांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी—अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये सातत्याने गुंतवणूक करणे अत्यावश्यक ठरेल.

डीप ब्रेन स्टिम्युलेशन (डीबीएस) घेण्याचा विचार करणाऱ्या रुग्णांनी सुरुवातीला मूव्हमेंट डिसऑर्डर स्पेशालिस्ट, जे सहसा न्यूरोलॉजिस्ट असतात, यांचा सल्ला घेणे आवश्यक असते. हे तज्ज्ञ या थेरपीचा रुग्णाला फायदा होईल का, याचे मूल्यमापन करतात. डीबीएस प्रक्रिया समन्वित आणि सांघिक दृष्टिकोनावर आधारित असते, ज्यामध्ये पुढील तपासणीसाठी रुग्णांना अनेकदा सर्वसमावेशक डीबीएस क्लिनिक किंवा न्यूरोसर्जरी बोर्डकडे पाठवले जाते. रुग्ण या उपचारांसाठी योग्य वाटला, तर हे शस्त्रक्रिया करण्यासाठी विशेष प्रशिक्षित असलेले फंक्शनल न्यूरोसर्जन केअर टीमसोबत मिळून शरीरात डिवाईस बसवण्याचे आणि त्याचे प्रोग्रामिंग करण्याचे काम करतात.

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

‘हात दाखवा कॅब थांबवा’ सीईओ कॅब्स चा उपक्रम**भारतातील पहिली "हायब्रिड" टॅक्सी सेवा- आता प्रवासी आणि चालक दोघांनाही मिळणार सन्मान आणि स्वातंत्र्य**शून्य कमिशन, प्रामाणिक भाडे आणि महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य