रिटायरमेंट नंतरच्या जीवनाकडे पाहणायचा नवा दृष्टीकोन हवा – मीनोचर पटेलडॉ. संजय रुणवाल यांच्या ‘गोल्डन रिटायरमेंट’ या नव्या पुस्तकात आर्थिक गणितापलीकडे जाऊन निवृत्तीनंतरच्या समाधानकारक आणि आनंदी जीवनाचा सखोल वेध




 रिटायरमेंट नंतरच्या जीवनाकडे पाहणायचा नवा दृष्टीकोन हवा – मीनोचर पटेल
डॉ. संजय रुणवाल यांच्या ‘गोल्डन रिटायरमेंट’ या नव्या पुस्तकात आर्थिक गणितापलीकडे जाऊन निवृत्तीनंतरच्या समाधानकारक आणि आनंदी जीवनाचा सखोल वेध  

पुणे, २६ एप्रिल २०२६ : निवृत्ती ही सक्रिय जीवनाचा अंत नसून जीवनाकडे नव्याने पाहण्याची संधी आहे. आर्थिक सुरक्षिततेपलीकडे जाऊन एकूणच आनंद, आरोग्य आणि जीवनाचा उद्देश यांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे, असे मत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वक्ते, कॉर्पोरेट प्रशिक्षक आणि नेतृत्व मार्गदर्शक मीनोचर पटेल यांनी व्यक्त केले. संजय रुणवाल फाउंडेशन चे संस्थापक डॉ. संजय रुणवाल लिखित ‘गोल्डन रिटायरमेंट- डिझाईन युअर नेक्स्ट चॅप्टर - बियाँड द बॅलन्सशीट ’ या पुस्तकाच्या प्रकाशन भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूटमधील नवलमल फिरोदिया सभागृहात विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीए रवी पंडित यांनी केले. या प्रसंगी प्रतिभा रुणवाल आणि सारिका रुणवाल उपस्थित होत्या.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात प्रख्यात व्यवसाय धोरण तज्ज्ञ अद्वैत कुरलेकर यांनी डॉ. रुणवाल यांच्याशी त्यांच्या नव्या पुस्तकाविषयी संवाद साधला. तसेच www.drsanjayrunwal.com या संकेतस्थळाचेही उद्घाटन करण्यात आले. या संकेतस्थळावर डॉ. रुणवाल यांनी लिहिलेल्या सर्व पुस्तकांची माहिती तसेच ही पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध असतील . त्यांच्या लोकप्रिय ‘थॉटफुल रिफ्लेक्शन्स फॉर अ मीनिंगफुल लाइफ', या पुस्तकाची अद्ययावत आवृत्ती या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याची घोषणा करण्यात आली

 परिपूर्ण जीवनासाठी आवश्यक हॅपिनेस क्वोशंट, इमोशनल क्वोशंट, हेल्थ क्वोशंट, सोशल क्वोशंट आणि स्पिरिच्युअल क्वोशंट या पाच स्तंभांचा उल्लेख करत मीनोचर पटेल यांनी सांगितले की, अनेक लोक आपला आनंद बाह्य गोष्टींवर अवलंबून ठेवतात पण खरा आनंद हा इतरांवर अवलंबून राहण्यात नाही तर स्वतःला आनंदी ठेवण्याची जबाबदारी स्वतः स्वीकारण्यात आणि भावनिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यात आहे . चांगले आरोग्य राखणे, नातेसंबंध जपणे आणि निःस्वार्थ सेवा व रोजच्या आयुष्यात चांगल्या कृतींद्वारे अध्यात्म जोपासणे तितकेच महत्त्वाचे आहे. चांगली नाती आणि खरी मैत्री आयुष्याची गुणवत्ता वाढवतात , असेही त्यांनी नमूद केले. जीवन आनंदी ठेवण्यासाठी त्यांनी काही सोपे पण प्रभावी ‘गुरुमंत्र’ दिले—जीवनात संतुलन राखा, नकारात्मकता सोडा, प्रत्येक दिवस शेवटचा असल्याप्रमाणे जगा, अपेक्षा कमी ठेवा आणि गोष्टी स्वीकारायला शिका , तसेच काही गोष्टींच्या बाबतीत जोडलेले तसेच अलिप्त राहण्याचा सराव करा.

आपल्या पुस्तकात मांडलेले विचार लोकांपर्यंत सहजपणे पोहचावेत म्हणून, डॉ. संजय रुणवाल यांनी विविध संक्षेप ( ऍक्रोनिम्स ) वापरले आहेत. त्यापैकी एक ए.इ डी ( अटॅचमेंट, एक्सपेक्टेशन्स अँड डिझायर्स ) चा उल्लेख करत ते म्हणाले की आपल्या बहुतांश दुःखाचे मूळ अपेक्षा, इच्छा आणि काही गोष्टींशी नको तेवढे जोडले जाणे यात आहे. निवृत्तीच्या उंबरठ्यावर अनेकजण यशाचे मोजमाप आर्थिक स्वातंत्र्य आणि समाजाने घालून दिलेल्या निकषांवर करतात. आपल्याकडे असलेल्या भौतिक संपत्ती ला दुय्यम स्थान असते, खरे मूल्य हे अंतर्गत असते. अंतर्गत मूल्य निर्माण करण्यावर भर दिल्यास तसेच आपली ओळख इतरांच्या मतांवर अवलंबून नं राहिल्यास खरे समाधान मिळेल . ‘गोल्डन रिटायरमेंट’ या पुस्तकाद्वारे वाचकांचे लक्ष अंतर्मुख होण्याकडे वळवण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. आयुष्यभर माणूस पद, प्रतिष्ठा आणि मालमत्ता यांसारख्या बाह्य आधारांवर अवलंबून राहतो; पण हे सर्व निघून गेल्यावर काय उरते, याचा विचार करणे गरजेचे आहे. त्यामुळे निवृत्तीला जबरदस्तीची समाप्ती न मानता, भूतकाळातून पुढे नेणारी किंवा अर्थपूर्ण भविष्याकडे ओढणारी जाणीवपूर्वक निवड म्हणून पाहणे आवश्यक आहे.

सेवा निवृत्ती म्हणजे अनेकदा सक्रीय जीवनाचा शेवट असा गैरसमज केला जातो. गोल्डन रिटायरमेंट - डिझाईन युवर नेक्स्ट चॅप्टर,बियाँड द बॅलन्स शीट या पुस्तकात डॉ.संजय रूणवाल यांनी या कल्पनेला आव्हान देत निवृत्तीला एका नव्या सुरूवातीचे नियोजन म्हणून रचना मांडली आहे.हे पुस्तक आर्थिक नियोजनाबद्दल नसून स्वत:ची ओळख पुन्हा शोधण्याबाबत,लवचिकता जोपासण्याबाबत आणि प्रतिष्ठेपलीकडे जपणारा वारसा निर्माण करण्याबद्दल आहे.पुस्तक निवृत्ती घेणाऱ्या व्यक्तींसाठी एक व्यावहारिक आणि प्रेरणादायी मार्गदर्शक आहे.हे पुस्तक याच सेवा निवृत्तीला सुवर्ण पर्व म्हणून घडविण्याची नवी संधी देते. यामध्ये ओळख,लवचिकता,सर्वांगीण विकास आणि वारसा यांवर भर देण्यात आला आहे.हे पुस्तक नेतृत्व करणाऱ्यांना आनंदाने निवृत्त जीवन जगण्यासाठी,आयुष्याला नव्याने घडविण्यासाठी आणि नव्या उर्जेने पुढे जाण्यासाठी मदत करते.भूमिकेपलीकडची ओळख,भावनिक लवचिकता,सर्वांगीण आरोग्य,दैनंदिन आनंद,वारसा निर्मिती अशा महत्त्वपूर्ण पैलूंचा शोध या पुस्तकाद्वारे घेता येणार 

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

‘हात दाखवा कॅब थांबवा’ सीईओ कॅब्स चा उपक्रम**भारतातील पहिली "हायब्रिड" टॅक्सी सेवा- आता प्रवासी आणि चालक दोघांनाही मिळणार सन्मान आणि स्वातंत्र्य**शून्य कमिशन, प्रामाणिक भाडे आणि महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य