भारताचा विकासदर बाह्य घटकांवर अवलंबून नाही*रिझर्व बँक ऑफ इंडिया सेंट्रल बोर्डचे संचालक सतीश मराठे : आधार सोशल फाउंडेशन आणि प्रसेनजीत फडणवीस मित्र परिवार यांच्यावतीने प्रसेनजीत फडणवीस यांचा सन्मान सोहळा


*भारताचा विकासदर बाह्य घटकांवर अवलंबून नाही*
रिझर्व बँक ऑफ इंडिया सेंट्रल बोर्डचे संचालक सतीश मराठे : आधार सोशल फाउंडेशन आणि प्रसेनजीत फडणवीस मित्र परिवार यांच्यावतीने प्रसेनजीत फडणवीस यांचा सन्मान सोहळा

पुणे: मध्यपूर्वेत तणाव असूनही भारताची अर्थव्यवस्था स्थिर आहे. काळजीचे काहीही कारण नाही. इंधनाच्या किमतींमुळे होणारी महागाई ही ‘इम्पोर्टेड इन्फ्लेशन’ आहे. ती फार वाढणार नाही. डॉलरच्या बदल्यातील घसरणीवरही चर्चा होते, पण जीडीपीच्या तुलनेत ही तूट फार मोठी नाही. ही तूट मागील २.५ वर्षांत १ % ते १.५ % दरम्यान होती आणि अनेक महिन्यांत ती सकारात्मकही होती. भारताची अर्थव्यवस्था मजबूत आहे. भारताचा विकासदर बाह्य घटकांवर अवलंबून नाही, असे मत रिझर्व बँक ऑफ इंडिया सेंट्रल बोर्डचे संचालक सतीश मराठे यांनी व्यक्त केले.

आधार सोशल फाउंडेशन आणि प्रसेनजीत फडणवीस मित्र परिवार यांच्यावतीने बँक ऑफ महाराष्ट्राच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल प्रसेनजीत फडणवीस यांचा सन्मान आणि अभिनंदन सोहळा आयोजित करण्यात आला होता. डेक्कन येथील गोखले इन्स्टिट्यूट जवळील मानव विकास संस्था (सारथी) पुणे येथे सन्मान सोहळा संपन्न झाला. यावेळी आमदार हेमंत रासने, सुनील कांबळे, जनसेवा सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र हिरेमठ, जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र हेजीब, राज्य सह. निवडणूक प्राधिकरणाचे निवृत्त सह आयुक्त संजय खडके, आधार सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष दिलीप काळोखे यावेळी उपस्थित होते.

सतीश मराठे म्हणाले, बँकिंग क्षेत्र जितके मोठे होईल तितकी देशाची प्रगती होणार आहे. अनेक भारतीय कंपन्या परदेशात गुंतवणूक करतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना आधार देण्यासाठी मजबूत भारतीय बँका आवश्यक आहेत. जगात ब्रिटिश, अमेरिकन, कोरियन, जपानी बँका त्यांच्या देशातील उद्योगांना मदत करतात. त्याचप्रमाणे भारतातही तसे व्हायला हवे. परदेशात व्यावसायिकांना सपोर्ट करायला आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय बँकांची गरज आहे. 

ते पुढे म्हणाले, राष्ट्रीयीकरणाच्या काळात, १९६९ मध्ये सुरू झालेल्या चळवळीबद्दल सांगायचे तर, ते फक्त राष्ट्रीयीकरण नव्हते, तर ‘सरकारीकरण’ होते. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा मालकी हक्क हा सर्वात मोठा प्रश्न आहे. तो तसाच ठेवायचा की बदल करायचा, यावर मोठी चर्चा आवश्यक आहे.

प्रसेनजीत फडणवीस म्हणाले, बँक ऑफ महाराष्ट्र ही भारतातील अग्रगण्य बँकांपैकी एक असून ती देशातील पहिल्या दहा बँकांमध्ये गणली जाते. काही काळापूर्वी बँकेच्या विलीनीकरणाबाबत चर्चा सुरू होती; मात्र आज ही बँक यशस्वीपणे प्रगती करत आहे. बँकिंग क्षेत्र हे नेहमीच तपासणीखाली असलेले क्षेत्र आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या माध्यमातून एमएसएमई क्षेत्राला मदत करणे आणि शेती क्षेत्रात सुधारणा घडवणे हे प्रमुख उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शेअरहोल्डर्सनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मी नक्कीच सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करेन, असेही त्यांनी सांगितले. मिलिंद लिमये यांनी सूत्रसंचालन केले. 

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

‘हात दाखवा कॅब थांबवा’ सीईओ कॅब्स चा उपक्रम**भारतातील पहिली "हायब्रिड" टॅक्सी सेवा- आता प्रवासी आणि चालक दोघांनाही मिळणार सन्मान आणि स्वातंत्र्य**शून्य कमिशन, प्रामाणिक भाडे आणि महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य