काँग्रेस शहराध्यक्ष निवडीसाठी मुलाखती पिंपरीत संपन्न दी.०९, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने सध्या देशात टप्प्याप्प्याने सुरू असलेले संघटन सृजन अभियान हे आज पिंपरी येथे एक हॉटेल मध्ये पार संपन्न झाले.

काँग्रेस शहराध्यक्ष निवडीसाठी मुलाखती पिंपरीत संपन्न 

दी.०९, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने सध्या देशात टप्प्याप्प्याने सुरू असलेले संघटन सृजन अभियान हे आज पिंपरी येथे एक हॉटेल मध्ये पार संपन्न झाले.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने केंद्रीय कार्यकारणीत झालेल्या निर्णयाप्रमाणे हे वर्ष काँग्रेसचे संघटन सक्षमीकरण वर्ष असणार आहे या अंतर्गत संघटन सृजन अभियान हे नव नेतृत्व निवडीसाठी अमलात आणलेले काँग्रेसचे अभियान आहे जे जिल्हास्तरावर निरीक्षकांना पाठवून कार्यकर्त्यांची, नागरिकांची, समाजातील, विविध स्तरातील मान्यवरांची मते जाणून घेतील, त्यांचा पक्षातील अनुभव, पक्षाशी असणारी एकनिष्ठता, भविष्यकालीन धोरण आणि एकंदरीतच सर्व क्षमता असणारे नेतृत्व याची पाहणी करत आणि बहुमत पसंतीने जिल्हाध्यक्ष, तालुका, ब्लॉक, अध्यक्ष, युवक काँग्रेस,महिला काँग्रेस, विद्यार्थी काँग्रेस यांचे अध्यक्ष निवडीबाबत या अभियानांतर्गत निर्णय घेऊन ते वरिष्ठांकडे पाठवण्यात येणार आहे. 

पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसच्या बैठकीमध्ये आज अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे निरीक्षक आणि हिमाचल प्रदेशचे आमदार विनोदजी सुलतानपुरी. पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार जयंत आसगावकर, काँग्रेसचे नेते भानुदास माळी, प्रदेश काँग्रेसचे निरीक्षक अजय सिंग हे विशेष उपस्थित होते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव पृथ्वीराज साठे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस बाबू नायर ,मनोज कांबळे दाहर मुजावर, विष्णुपंत नेवाळे सजीव वर्की, युवक काँग्रेस महिला काँग्रेस एनएसई सेवा दलाल्पसंख्यांक विभाग मागासवर्गीय विभाग यांचे अध्यक्ष इतर वरिष्ठ नेते आणि पिंपरी चिंचवड शहरातील काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

या प्रसंगी मुख्य निरीक्षक विनोद सुलतानपूरी यांनी प्रत्येक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची वेगवेगळी भेट घेत त्यांचे म्हणणे प्रत्यक्ष एका एकाच्या भेटीत गुप्तपणे ऐकून घेतले. 

याप्रसंगी शहराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचे अर्ज भरून घेण्यात आले याप्रसंगी जवळपास 25 ते 30 जणांनी आपले शहराध्यक्ष पदाचे उमेदवार अर्ज निरीक्षकांकडे सादर केले नंतर प्रत्येकाच्या वैयक्तिक मुलाखती खाजगी स्वरूपात घेऊन सर्वांची मते ऐकून घेण्यात आली. काहीजणांनी आपल्या समर्थकांसहित मुलाखत देणे पसंत केले तर काहीजणांनी एकट्याने मुलाखत दिली.

तसेच इतर निरीक्षकांपैकी असलेले आमदार जयंत आजगावकर भानुदास माळी आणि अजय सिंग यांनी इतर पदांसाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांची नावे लिहून घेतली त्यांची माहिती सविस्तरपणे घेतली. 

पुढील टप्प्यात या अभियानाची माहिती ही मध्यवर्ती काँग्रेस कमिटीकडे पाठवण्यात येणार आहे आणि त्यातून शहराध्यक्षाची निवड ही लवकरच महिन्याभरात केली जाणार आहे. 

इच्छुकांमधील प्रमुख दावेदारांमध्ये युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि शहर काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, माजी नगरसेवक तुकाराम भोंडवे, ओबीसी नेते सोमनाथ शेळके, संदेश नवले, मनोज कांबळे, निखिल भोईर युनूस बागवान, विठ्ठल शिंदे, मनीषा गरुड, कौस्तुभ नवले, महेश बिराजदार, विशाल कसबे, मयूर जयस्वाल, अनिरुद्ध कांबळे, बाबू नायर, रवी नांगरे, आबा खराडे, दहार मुजावर, अमर नाणेकर यांनी तसेच इतर काही जणांनी मुलाखत दिली.

येणाऱ्या महिन्याभरात काँग्रेस पक्षाला नवा अध्यक्ष मिळेल हे या अभियानाच्या संपन्नतेवरून स्पष्ट झाले आहे. 

नवीन शहराध्यक्ष कोण होणार याबाबत सध्या काँग्रेसच्या गोटामध्ये चर्चा खलबते आणि दावेप्रति दावे यांना उधाण आले आहे. 
येणाऱ्या अध्यक्षाच्या रूपाने संघटन सजन अभियानाद्वारे निवडलेल्या नेतृत्वाचा किती परिणाम शहराच्या राजकारणावर पडतो हे येणारा काळ सांगेल.

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

‘हात दाखवा कॅब थांबवा’ सीईओ कॅब्स चा उपक्रम**भारतातील पहिली "हायब्रिड" टॅक्सी सेवा- आता प्रवासी आणि चालक दोघांनाही मिळणार सन्मान आणि स्वातंत्र्य**शून्य कमिशन, प्रामाणिक भाडे आणि महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य