सागरी जीवन आणि समुद्राच्या निसर्गरम्य दृश्यांचे छायाचित्र व चित्रकला प्रदर्शन
सागरी जीवन आणि समुद्राच्या निसर्गरम्य दृश्यांचे छायाचित्र व चित्रकला प्रदर्शन
पुणे, १ एप्रिल २०२६ : सागरी संघटना असलेल्या कंपनी ऑफ मास्टर मॅरिनर्स ऑफ इंडिया (सीएमएमआय), इन्स्टिट्यूट ऑफ मरीन इंजिनियर्स इंडिया (आयएमईआय) आणि इंडियन मॅरिटाइम फाउंडेशन (आयएमएफ) यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच महा मॅरिनर्स असोसिएशन (एमएमए) आणि अमेझेंग नॉटिकल असोसिएशन (एएनए) यांच्या सहकार्याने कला रसिक आणि सागरी जीवनाची आवड असणाऱ्यांसाठी ५ ते ७ एप्रिल २०२६ दरम्यान पुण्यात एक वैशिष्ट्यपूर्ण प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन जंगली महाराज रोडवरील बालगंधर्व कलादालन येथे सकाळी १०.०० ते रात्री ८.०० या वेळेत पाहता येईल. यात सागरी व्यावसायिकांनी साकारलेल्या सर्जनशील कलाकृतींचे दर्शन घडणार आहे.या प्रदर्शनाचे उदघाटन ५ एप्रिल रोजी सायंकाळी ४.०० वाजता प्रमुख पाहुणे व्हाईस ॲडमिरल अनिल जग्गी एव्हीएसएम, कमांडंट एनडीए यांच्या हस्ते होणार आहे.
‘होरायझन्स अँड सीस्केप्स’ या संकल्पनेवर आधारित या प्रदर्शनात सुमारे १२५ कलाकृतींचा समावेश असून, त्यात चित्रे आणि छायाचित्रांचा समावेश आहे. या कलाकृतींमधून समुद्राचे विविध पैलू आणि समुद्रावर प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या व्यक्तींच्या अनुभवातून उमटलेल्या सागरी जीवनाची दुर्मिळ झलक पाहायला मिळणार आहे. या उपक्रमाचा उद्देश सागरी संस्कृती, सर्जनशीलता आणि खलाश्यांच्या वैयक्तिक अनुभव लोकांपर्यंत पोहचविणे हा आहे.
Comments
Post a Comment