स्प्राइट आपला अद्वितीय फ्लेवर 'स्‍प्राइट लेमन मिंट'सह यंदा उन्‍हाळ्यामध्‍ये मिंट स्‍वादाचा अनुभव देणार


स्प्राइट आपला अद्वितीय फ्लेवर 'स्‍प्राइट लेमन मिंट'सह यंदा उन्‍हाळ्यामध्‍ये मिंट स्‍वादाचा अनुभव देणार
 

नवी दिल्ली, एप्रिल 22, 2026: भारतात उन्हाळा सुरू झाला की शरीराला थंडावा कसा द्यायचा, हे भारतातील लोकांना माहित आहे. थंड पेयांमध्ये कुस्करून टाकलेला असो किंवा लिंबू आणि फिझ ड्रिंकमध्ये मिसळलेला असो पुदिना (मिंट) हा भारतातील घरगुती थंडावा देणारा एक पारंपरिक उपाय आहे. स्‍प्राइट ग्राहकांच्या याच आवडीला एका अर्थपूर्ण कल्पनेत रूपांतरित करत आहे, ज्‍याचे उत्तम उदाहरण म्हणजे 'स्प्राइट लेमन मिंट'. लिंबू आणि पुदिन्याचे हे मिश्रण संस्कृतीशी जोडलेले तर आहेच, शिवाय ते ताजेपणा देखील वाढवते. भारतातील आपल्या पहिल्याच फ्लेव्हर इनोव्हेशनमध्ये ब्रँडने त्यांच्या सिग्नेचर शार्प लेमनला पुदिन्याच्या थंडाव्याची जोड दिली आहे, ज्यामुळे व्‍यक्तींच्‍या आवडीच्या चवीला रिफ्रेशमेंटच्या नवीन स्‍तरावर नेले आहे.

स्प्राइट लेमन मिंटचे खास वैशिष्ट्य म्हणजे यात ओळखीची चव आणि नावीन्य यांचा अचूक समतोल साधला आहे. हेच वैशिष्ट्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्‍टुडिओएक्‍स डब्‍ल्‍यूपीपीने एक नवीन जाहिरात तयार केली आहे. यामध्ये अभिनेता सुनिल ग्रोव्हर मुख्य भूमिकेत आहे, जे ब्रँडच्या 'थंड रख' तत्त्वज्ञानाला सादर करतात. या जाहिरातीत दैनंदिन जीवनातील प्रसंग दाखवले आहेत, जिथे तापमान वाढते आणि अशा वेळी तुम्हाला फक्त त्‍वरित रिफ्रेशमेंटची गरज असते. आपल्या खास शैलीत सुनिल ग्रोव्हर संदेश देतात की, कधी-कधी सर्वात समंजस प्रतिक्रिया म्हणजे लगेच प्रतिसाद न देता शांत राहणे हाच असतो.

सुनिल ग्रोव्हर म्हणाले, "आपण सर्वजण पुदीन्यासह उन्हाळ्यातील पेयांचा आस्‍वाद घेत मोठे झालो आहोत, त्यामुळे ही चव मला लगेच ओळखीची वाटली. स्प्राइट लेमन मिंट हीच संकल्पना अतिशय सोप्या आणि सहज रूपात समोर आणते. या मोहिमेबद्दल मला सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे, दैनंदिन जीवनातील खरे प्रसंग यात टिपले आहेत, जेव्हा तुम्हाला फक्त काहीतरी रिफ्रेशिंग हवे असते."

कोका-कोला इंडिया व साऊथवेस्‍ट एशियाच्‍या स्‍पार्कलिंग फ्लेवर्सच्‍या कॅटेगरी हेड सुमेली चॅटर्जी म्हणाल्या, "ग्राहक आधीच पुदिन्याची पाने आणि स्प्राइटचा वापर करून जे प्रयोग करत आहेत, त्यातून स्प्राइट लेमन मिंट प्रेरणा घेते. हे सांस्कृतिकदृष्ट्या परिचित असलेले मिश्रण आम्ही ताज्या, नैसर्गिक आणि नाविन्यपूर्ण पद्धतीने एकत्र आणले आहे. आमच्या आयकॉनिक लेमन-लाइम चवीमध्ये पुदिन्याचा जबरदस्त ट्विस्ट देऊन आम्ही बहु-संवेदी थंडावा वाढवत आहोत, ज्याची मागणी ग्राहक आजकाल मोठ्या प्रमाणावर करत आहेत. भारतातील उन्हाळ्यासाठी हे पेय अगदी योग्‍य आहे. मर्यादित काळासाठी उपलब्ध असलेले हे उत्पादन स्प्राइटचा पुन्हा एकदा आस्‍वाद घेण्याचा उत्साहवर्धक मार्ग आहे. हे पेय स्प्राइटच्या मूळ मूल्यांशी प्रामाणिक राहून पुदिन्याची ताजी चव ग्राहकांना देते, जे सर्वोत्तम रिफ्रेशिंग पेय आहे."

व्‍हीएमल आणि स्‍टुडिआएक्‍स डब्‍ल्‍यूपीपीचे नॅशनल क्रिएटिव्‍ह डायरेक्‍टर रणदीप दासगुप्‍ता म्हणाले, "भारतात पहिल्यांदाच मर्यादित एडिशनमध्‍ये लाँच होत असलेल्या स्प्राइट लेमन मिंटच्या निमित्ताने आम्हाला स्प्राइटची ओळख आजच्या प्रेक्षकांसाठी अधिक सुसंगत पद्धतीने मांडण्याची संधी मिळाली. आमच्‍या निदर्शनास आले की, भारतात उन्हाळा ठिकठिकाणी दमट आणि चकचकीत दुपार, तर कुठे कोरडी, थकवणारी उष्णता अशा स्‍वरूपाचा असला तरीही प्रत्येकाची एक अशी ब्रेकिंग पॉईंट मर्यादा असते जिथे हवामान असहनशील होते. अशा वेळी, तुम्हाला फक्त त्‍वरित थंडावा पाहिजे असतो. तिथेच स्प्राइट लेमन मिंटची एंट्री होते! 'मिंट लगा' हे शब्द ती भावना अचूकपणे टिपतात आणि उत्पादनाचे सत्य व्हायरल ब्रीदवाक्यात रूपांतरित करतात."

ही मोहीम अत्‍यंत प्रभावी सादरीकरण म्‍हणून डिझाइन करण्‍यात आली आहे, तसेच संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुसंगततेवर आधारित आहे. याला सोशल मीडियावरील सातत्यपूर्ण प्रसिद्धी आणि रिटेल स्टोअर्समधील विशेष मांडणी व रिटेल टूलकिट्सद्वारे उत्तम दृश्यमानतेची जोड देण्यात आली आहे, ज्‍यामुळे खरेदीचा निर्णय घेताना हे उत्पादन ग्राहकांच्‍या समोर असेल.

निवडक बाजारपेठांमध्ये उपलब्ध असलेले स्प्राइट लेमन मिंट मर्यादित कालावधीसाठी बाजारपेठेत उपलब्ध असेल, ज्यामुळे या उन्हाळ्यातील रिफ्रेशमेंटच्या पर्यायांमध्ये ही वेळेवर झालेली भर ठरेल.



Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

‘हात दाखवा कॅब थांबवा’ सीईओ कॅब्स चा उपक्रम**भारतातील पहिली "हायब्रिड" टॅक्सी सेवा- आता प्रवासी आणि चालक दोघांनाही मिळणार सन्मान आणि स्वातंत्र्य**शून्य कमिशन, प्रामाणिक भाडे आणि महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य