धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्षाचे उद्घाटन आणि शिवसेना निष्ठावंत कार्यकर्त्यांना धर्मवीर आनंद दिघे पुरस्कार प्रधान



धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्षाचे उद्घाटन आणि शिवसेना निष्ठावंत कार्यकर्त्यांना धर्मवीर आनंद दिघे पुरस्कार प्रधान 

 

पुण्यातील शिवसेना भवनामध्ये धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्षाचे तसेच पश्चिम महाराष्ट्र विभागीय कार्यालयाचे उद्घाटन उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. 

शिवसेना पक्षातील कार्यकर्त्यांचा सन्मान यावेळी करण्यात आले. 
 पुणे शहर जिल्हा शिक्षक शिक्षकेतर प्रमुख अनिल गडकरी सर यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल तसेच सामाजिक.अत्यावश्यक दुर्लक्षित नागरी समस्याबद्दल कसबा विधानसभा प्रमुख निलेश जगताप, ववैद्यकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल राजाभाऊ भिलारे. रक्तदान क्षेत्रात सातत्यपूर्वक काम करणारे प्रकाश ढमढेरे. उपेक्षित खेळाडूंच्या पाठीशी उभे राहून त्यांना प्रोत्साहन देणारे शंकर संगम. पक्षाच्या संपर्क क्षेत्रात कार्यामध्ये अनिल बटाने. यांना पुणे सारसबाग येथील शिवसेना भवनामध्ये महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत व विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोरे यांच्या हस्ते धर्मवीर आनंद दिघे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना निवडणूक राज्य समन्वयक व राज्य कक्ष प्रमुख धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्ष वैभव वाघ यांनी केले. यावेळी शिवसेना पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे, पुणे शहर सहसंपर्कप्रमुख अजय बापू भोसले, शिव कामगार सेना प्रदेश अध्यक्ष सुधीर कुरुमकर, आबा बागुल, सचिन मामा थोरात,सुनील जाधव, प्रमोद प्रभुणे, विश्वास दिघे, सागर घोलप, यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

‘हात दाखवा कॅब थांबवा’ सीईओ कॅब्स चा उपक्रम**भारतातील पहिली "हायब्रिड" टॅक्सी सेवा- आता प्रवासी आणि चालक दोघांनाही मिळणार सन्मान आणि स्वातंत्र्य**शून्य कमिशन, प्रामाणिक भाडे आणि महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य