मलबार गोल्ड अँड डायमंड्सच्या 'अनिका' या नैसर्गिक डायमंड कलेक्शनचे करीना कपूर खानच्या हस्ते उद्घाटन
मलबार गोल्ड अँड डायमंड्सच्या 'अनिका' या नैसर्गिक डायमंड कलेक्शनचे करीना कपूर खानच्या हस्ते उद्घाटन
राष्ट्रीय, 17 एप्रिल 2026: दागिने विक्रीतील जगातील आघाडीची कंपनी आणि जबाबदारी तसेच विश्वासाचे मूर्तिमंत प्रतीक असलेला 'मलाबार गोल्ड अँड डायमंड्स' हा बँड, 'आनिका' हे नैसर्गिक हिऱ्यांच्या दागिन्यांचे एक अप्रतिम कलेक्शन सादर करत आहे. परंपरा आणि अत्यंत नाजूक कलाकुसरीपासून प्रेरणा घेऊन साकारण्यात आलेले हे कलेक्शन, चित्रपट अभिनेत्री करीना कपूर खान हिच्या हस्ते अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर प्रदर्शित करण्यात आला. सांस्कृतिक समृद्धी आणि समकालीन नजाकत यांचा अत्यंत सुरेख मेळ म्हणजे हा संग्रह.
अक्षय्य तृतीयेची ओळख असलेल्या भक्ती आणि समृद्धीच्या भावनेतून, 'आनिका' आधुनिक स्त्रीसाठी परंपरेची नव्याने व्याख्या करते. सोने आणि नैसर्गिक हिरे हे पिढ्यानपिढ्या पवित्रता, टिकाऊपणा आणि समृद्धीचे प्रतीक राहिले आहेत. या वारशाचा सन्मान करत, दागिन्यांचे हे कलेक्शन अब्जावधी वर्षांपासून तयार झालेल्या नैसर्गिक हिऱ्यांची दुर्मिळता आणि अस्सलता समोर आणतो. ज्यामुळे प्रत्येक दागिना केवळ एक दागिना न राहता, निसर्गाच्या उत्कृष्ट कलाकुसरीचे एक कालातीत प्रतीक बनतो.
मंदिरांची वास्तुकला, दैवी परंपरा असलेले विशिष्ट भौमितिक आकार आणि गुंतागुंतीच्या कोरीव कामांमधून 'आनिका प्रेरणा घेते, आणि 'नैसर्गिक हिऱ्यांमध्ये घडवलेल्या देवी कथा' जिवंत करते, हेच या संग्रहाचे मोठे यश आहे. प्राचीन आकृतिबंधांचे रूपांतर शुद्ध, समकालीन डिझाइनमध्ये केले जाते, जिथे कमानी, शिखरे आणि अलंकारिक नमुने नावीन्सपूर्णतेने साकारले आहेत. प्रत्येक निर्मिती नैसर्गिक हिऱ्यांनी उजळून निघते, जी तिचे वेगळेपण, चमक आणि चिरस्थायी मूल्य दर्शवते.
मंदिरांच्या रचनेची आठवण करून देणाऱ्या आकर्षक नेकलेसपासून ते प्राचीन कलाकुसरीपासून प्रेरित असलेल्या नाजूक नक्षीकाम असलेल्या कानातल्यांपर्यंत, प्रत्येक निर्मिती उत्कृष्ट कारागिरीचे दर्शन घडवते. पारंपरिक कडे आणि उत्तम कलाकुसर असलेल्या बांगड्या हीच परंपरा पुढे नेतात, आणि नैसर्गिक हिऱ्यांच्या कालातीत आकर्षणावर आधारित, सणासुदीच्या प्रसंगांपासून ते आधुनिक काळातील अभिजाततेपर्यंत सहजपणे जुळवून घेणाऱ्या बहुपयोगी डिझाइन्स सादर करतात.
या लॉन्चप्रसंगी मलबार ग्रुपचे चेअरमन, श्री. एम. पी. अहमद म्हणाले, "आजच्या ग्राहकांच्या इच्छांनुसार बदल करत
असताना, वारसा जतन करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे 'आनिका' हे प्रतीक आहे. नैसर्गिक हिऱ्यांवर विशेष लक्ष केंद्रित करत, हा संग्रह दुर्मिळता, अस्सलपणा आणि कारागिरी यांचे प्रतीक आहे, आणि असे दागिने तयार करतो जे परंपरा आणि समकालीन जाणिवा या दोन्हींशी खोलवर मिळताजुळता आहे.
मलबार गोल्ड अँड डायमंड्सच्या सर्व शोरूम्समध्ये उपलब्ध असलेले आनिका हे नैसर्गिक हिऱ्यांच्या दागिन्यांचा एक विचारपूर्वक तयार केलेले कलेक्शन सादर करते. प्रत्येक दागिन्यात आंतरराष्ट्रीय स्त्रावर प्रमाणित हिरे जडवलेले आहेत, आणि त्याला ब्रँडच्या वैशिष्ट्यपूर्ण हमीचा आधार आहे, ज्यात आयुष्यभर देखभाल, खरेदीची हमी आणि सोन्याच्या दागिन्यांवर 100% विनिमय मूल्य यांचा समावेश आहे.
जबाबदार व्यवसायाची आपली वचनबद्धता अधिक दृढ करत, 'मलाबार गोल्ड अॅड डायमंड्स आपल्या नफ्यातील 5% वाटा शिक्षण, आरोग्यसेवा, महिला सक्षमीकरण, पर्यावरणीय शाश्वतता आणि समाजकल्याण यांसारख्या ईएसजी उपक्रमांसाठी समर्पित करते.
'आनिका'द्वारे, 'मलाबार गोल्ड अँड डायमंड्स' आपल्या समृद्ध वारशाची एक अत्यंत सुबक आणि उत्तम अभिव्यक्ती सादर करते, जिथे नैसर्गिक हिऱ्यांपासून घडवलेली प्रत्येक कलाकृती ही परंपरा, सौंदर्य आणि चिरंतन मूल्याचे एक कालातीत प्रतीक ठरते.
Comments
Post a Comment