महिला उद्योजक गुणवत्ता पुरस्कार ” प्रदान



“महिला उद्योजक गुणवत्ता पुरस्कार ” प्रदान

रोटरी क्लब ऑफ पुना नॉर्थच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आरोमी क्लब पाषाण रोड,पुणे येथे झालेल्या एका विशेष समारंभात १६ महिलांना “महिला उद्योजक गुणवत्ता पुरस्कार” प्रदान करण्यात आले.

या वेळी रोटरीचे माजी प्रांतपाल रवी धोत्रे ,क्लबचे अध्यक्ष मोहन पुजारे , सेक्रेटरी सुयेश नायर,अवॉर्ड कमिटीचे अध्यक्ष अरविंद सुरंगे,दीपक टक्कर आणि रोटरीचे इतर सभासद तसेच व पुरस्कार विजेत्या व पाहुणे मोठ्या संख्येने उपस्थित होते .

विविध क्षेत्रातील उद्योजक महिलांना प्रेरणा व त्यांच्या कामाचे कौतुक करणे या उद्देश्याने महिला उद्योजक गुणवत्ता पुरस्कार” सतत ३९ वर्षे दिले जात आहेत. अशी माहिती अरविंद सुरंगे यांनी दिली. तसेच या कामात विशेष मदत केल्याबद्दल कमीटी मेंबर्स दीपक टक्कर,नीलम बेंडे,अनघा छत्रे व अपूर्वा कुलकर्णी नायर यांचे आभार मानले.

रवी धोत्रे म्हणाले “स्त्रीला सुशिक्षित व स्वतंत्र करण्यात अण्णासाहेब कर्वे आणि ज्योतीबा फुले यांचा महत्वाचा वाटा आहे.आधुनिक स्त्रियांना याची जाणीव करून देणे व महाराष्ट्राची वैचारिक व आध्यात्मिक मानसिकता दाखविण्यासठी रोटरी अशा प्रकारचे कार्यक्रम आखत असते”.स्त्री आदिशक्तीचा सुंदर सन्मान सोहळा केल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे कौतुक केले.

या समारंभाच्या वेळी. प्रिया व्यंकटरमण,श्वेता गुंजकर,कीर्ती अडवाणी, गायत्री मठकर,सुजल शहा,चित्रा आपटेअपूर्वा कुलकर्णी नायर,सुहानी धडफळे कु.पल्लवी आढाव,शारदा चव्हाण, डॉ. सोनिका शहा यांना पुरस्कार तर प्रिती मुंढे , अश्विनी कुदळे, प्रीती साताळकर, लीना खनके, स्नेहल बुऱ्हाडे व शालिनी गोविल यांना प्रशंसा प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले

पुरस्कार प्राप्त माहिलांनी आपल्या व्यवसायाबद्दल माहिती सांगितली व पुरस्काराबद्दल रोटरी क्लबचे आभार मानले.

नीलम बेंडे यांनी सूत्रसंचालन केले.दीपक टक्कर यांनी सर्वांचे आभार मानले 

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

‘हात दाखवा कॅब थांबवा’ सीईओ कॅब्स चा उपक्रम**भारतातील पहिली "हायब्रिड" टॅक्सी सेवा- आता प्रवासी आणि चालक दोघांनाही मिळणार सन्मान आणि स्वातंत्र्य**शून्य कमिशन, प्रामाणिक भाडे आणि महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य