डी.जी. इंफ्रा युनिकॉर्न संघ विजेताआनंद दर्शन युवा मंच प्रीमियर लीग : लब्धि के टायगर उपविजेता.
डी.जी. इंफ्रा युनिकॉर्न संघ विजेता
आनंद दर्शन युवा मंच प्रीमियर लीग : लब्धि के टायगर उपविजेता.
पुणे : आनंद दर्शन युवा मंच आयोजित प्रीमियर लीग २०२६ क्रिकेट सीजन ६ स्पर्धेत डी. जी. इंफ्रा युनिकॉर्न संघाने दमदार आणि शानदार खेळ करत विजेतेपद पटकावले. लब्धि के टायगर संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
ही स्पर्धा गंगाधाम चौक पुणे येथे डाउनटाऊन मैदानावर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत १० संघांनी सहभाग नोंदवत एकूण २५ सामने रंगले.
विजेत्या डी. जी. इंफ्रा युनिकॉर्न संघाला २७,००० रुपये रोख व करंडक प्रदान करण्यात आला, तर उपविजेत्या संघाला १५,००० रुपये रोख व करंडक देण्यात आला.
वैयक्तिक पुरस्कारांमध्ये शुभम धोका यांनी मालिकावीर (Man of the Series) किताब पटकावला. मदन कटारिया यांना सर्वोत्तम फलंदाज, महावीर संचेती यांना सर्वोत्तम गोलंदाज, तर शुभम मंडलेचा यांना सर्वोत्तम क्षेत्ररक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. लब्धि के टायगर संघाला फेअर प्ले पुरस्काराने गौरविण्यात आले.
स्पर्धेदरम्यान अमित व रोशन कोटेचा, आशिष बोरा, महेश खींवसरा, संतोष ललवानी, अजय बंब, पवन व प्रतीक चोरडिया, स्वप्निल व संदेश खींवसरा, विवेक शर्मा, आनंद छाजेड़ आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचे सूत्रसंचालन सौरभ धोका यांनी केले.
Comments
Post a Comment