पाषाण–बाणेर लिंक रोडवरील पासपोर्ट सेवा केंद्रासाठी वाहतूक व्यवस्थापनावर 8 एप्रिल रोजी संयुक्त बैठक*

*पाषाण–बाणेर लिंक रोडवरील पासपोर्ट सेवा केंद्रासाठी वाहतूक व्यवस्थापनावर 8 एप्रिल रोजी संयुक्त बैठक*

पुणे : पाषाण–बाणेर लिंक रोड येथे नुकत्याच  सुरू झालेल्या  पासपोर्ट सेवा केंद्राच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व परिसर व्यवस्थापनाबाबत संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही संयुक्त बैठक येत्या 8 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता औंध रोड क्षेत्रिय कार्यालयात होणार असल्याची  माहिती नगरसेववक चंद्रशेखर उर्फ सनी निम्हण यांनी दिली.  

नगरसेवक सनी निम्हण यांनी संबंधित विभागांना पाठवलेल्या पत्रव्यवहार व सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही बैठक आयोजित करण्यात आली असून, संभाव्य वाहतूक कोंडी, पार्किंगची समस्या, अतिक्रमण तसेच परिसर व्यवस्थापनाच्या अडचणी टाळण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा होणार आहे.

या बैठकीस महापालिका, वाहतूक पोलिस आणि सर्व संबंधित विभागांचे अधिकारी सहभागी होणार आहेत. या  परिसरातील नागरिकांनी या बैठकीस उपस्थित राहून सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन निम्हण यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

‘हात दाखवा कॅब थांबवा’ सीईओ कॅब्स चा उपक्रम**भारतातील पहिली "हायब्रिड" टॅक्सी सेवा- आता प्रवासी आणि चालक दोघांनाही मिळणार सन्मान आणि स्वातंत्र्य**शून्य कमिशन, प्रामाणिक भाडे आणि महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य