पहिल्या डेक्कन इलाईट कप बास्केटबॉल स्पर्धेत 32 संघ सहभागी
पहिल्या डेक्कन इलाईट कप बास्केटबॉल स्पर्धेत 32 संघ सहभागी
पुणे, 4 एप्रिल, 2026: डेक्कन जिमखाना यांच्या वतीने आयोजित पहिल्या डेक्कन इलाईट कप बास्केटबॉल स्पर्धेत 16 वर्षांखालील मुले व मुलींच्या गटात 32 संघांनी आपला सहभाग नोंदवला आहे. हि स्पर्धा डेक्कन जिमखाना बास्केटबॉल कोर्ट या ठिकाणी 7 ते 12 एप्रिल 2026 या कालावधीत रंगणार आहे.
डेक्कन जिमखानाचे मानद सचिव मिहीर केळकर म्हणाले की, शहरांतील युवा बास्केटबॉल पटूंना आपली गुणवत्ता दाखविण्याची संधी मिळावी या हेतूने पहिल्या डेक्कन इलाईट कप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून बास्केटबॉल खेळाचा प्रसार आणखी वाढावा व खेळाडूंना स्पर्धात्मक स्वरूप प्राप्त व्हावे हा यामागील उद्देश आहे.
स्पर्धेतील सहभागी 32संघामध्ये मुलांच्या गटात 16 संघ आणि मुलींच्या गटात 16 संघांचा समावेश आहे. मुलांच्या गटात डेक्कन जिमखाना, राहुल सिंग बास्केटबॉल अकादमी, नाहाटा, विद्यांचल, एसजी अकादमी, मस्तान, विद्या व्हॅली, एसएसबीए, बीड, एबीसी, सीबीसी, ग्राउंड युपी, सेंट मेरीज, एनबी हुप्स सातारा, एमएसडी बास्केटबॉल अकादमी, रणजित गुजर बास्केटबॉल अकादमी सातारा यांचा तर, मुलींच्या गटात डेक्कन जिमखाना अ, सिटी प्राईड स्कुल निगडी, एसजी अकादमी, विद्या व्हॅली, महाराष्ट्र मंडळ, एबीसी, दस्तूर, चोंदे पाटील, सेंट मेरीज, साई स्पोर्ट्स अकादमी, एमएसडी बास्केटबॉल अकादमी, डेक्कन जिमखाना ब, शार्प शूटर्स, विद्यांचल, फाल्कन्स, स्पोर्टजी हे संघ आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.
स्पर्धेत विजेत्या संघाला करंडक व 40,000/-रुपये, तर उपविजेत्या संघाला करंडक व 20,000/- रुपये आणि तृतीय क्रमांक पटकवणाऱ्या संघाला करंडक व 10,000/- रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. याशिवाय मालिकावीर विजेत्या खेळाडूला आकर्षक अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेचे उदघाटन महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेचे मानद सर चिटणीस गोविंद कृष्णन आणि खजिनदार इब्राहिम लाकडवाला यांच्या हस्ते करण्यात आले.
Comments
Post a Comment