एमएसएलटीए पीएमडीटीए एआयटीए अखिल भारतीय मानांकन 1लाख पारितोषिक रकमेची टेनिस स्पर्धेत प्रसाद इंगळे याला दुहेरी मुकुट

एमएसएलटीए पीएमडीटीए एआयटीए अखिल भारतीय मानांकन 1लाख पारितोषिक रकमेची टेनिस स्पर्धेत प्रसाद इंगळे याला दुहेरी मुकुट 

पुणे, 18 एप्रिल 2026: पॉल प्रो टेनिस अकादमी यांच्या वतीने व ब्लेझ ऑलिंपिया यांच्या सहकार्याने आयोजित एमएसएलटीए पीएमडीटीए एआयटीए अखिल भारतीय मानांकन 1लाख पारितोषिक रकमेची टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राच्या प्रसाद इंगळे याने एकेरी व दुहेरी या दोन्ही गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला.

सुस रोड येथील सनी वर्ल्ड टेनिस कोर्टवर पार पडलेल्या या स्पर्धेत एकेरीत मुख्य ड्रॉमध्ये अंतिम फेरीत चौथ्या मानांकित प्रसाद इंगळे याने रिशीत दाखनेचा 6-2, 6-4 असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. 

दुहेरीत अंतिम फेरीत अव्वल मानांकीत प्रसाद इंगळे व संदेश कुरळे या जोडीने दुसऱ्या मानांकित पारितोष पवार व निरव शेट्टी यांचा 6-2, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकावले. 

स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व रोख रकमेची पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण ब्लेझ ऑलिंपियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रिज सिंग, स्पर्धा संचालक प्रसनजीत पॉल यांच्या हस्ते करण्यात आले. 

निकाल: मुख्य ड्रॉ: अंतिम फेरी: एकेरी: पुरुष:
प्रसाद इंगळे(4)(महाराष्ट्र) वि.वि.रिशीत दाखने(महाराष्ट्र) 6-2 , 6-4;  

दुहेरी गट: प्रसाद इंगळे/संदेश कुरळे(1)(महाराष्ट्र)वि.वि. पारितोष पवार/निरव शेट्टी(2)(महाराष्ट्र)6-2, 6-3.

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

‘हात दाखवा कॅब थांबवा’ सीईओ कॅब्स चा उपक्रम**भारतातील पहिली "हायब्रिड" टॅक्सी सेवा- आता प्रवासी आणि चालक दोघांनाही मिळणार सन्मान आणि स्वातंत्र्य**शून्य कमिशन, प्रामाणिक भाडे आणि महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य