एमएसएलटीए व डेक्कन जिमखाना बी1 आशियाई कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत अर्णव पापरकर, समर्थ संहिता, तविश पाहवा, जेन्सी कानबर, दिया रमेश यांचा उपांत्य फेरीत प्रवेश

एमएसएलटीए व डेक्कन जिमखाना बी1 आशियाई कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत अर्णव पापरकर, समर्थ संहिता, तविश पाहवा, जेन्सी कानबर, दिया रमेश यांचा उपांत्य फेरीत प्रवेश 

पुणे, 23 एप्रिल 2026: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना यांच्या वतीने व पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना व डेक्कन जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एमएसएलटीए व डेक्कन जिमखाना बी1 आशियाई कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत मुलांच्या गटात अर्णव पापरकर, तविश पाहवा यांनी तर, मुलींच्या गटात जेन्सी कानबर, दिया रमेश या भारतीय खेळाडूंनी उपांत्य फेरीत प्रवेश केला.

डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर आंतरराष्ट्रीय टेनिस संघटना(आयटीएफ), आशियाई टेनिस संघटना(एटीएफ), अखिल भारतीय टेनिस संघटना(एआयटीए) यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये एकेरीत मुलांच्या गटात भारताच्या तविश पाहवा याने समर्थ संहिताचा 3-6, 6-3, 6-4 असा तीन सेटमध्ये पराभव करून उपांत्य फेरी गाठली. दुसऱ्या मानांकित भारताच्या अर्णव पापरकर याने कोरियाच्या सेउंग-मिन ओहचा 6-2, 4-6, 6-4 असा पराभव करून आपली विजयी मालिका कायम ठेवली. बिगर मानांकित कोरियाच्या जुनसेओ जंग याने ऑस्ट्रेलियाच्या चौथ्या मानांकित जेक डेम्बोचा 6-3, 6-3 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. अव्वल मानांकित जपानच्या ह्यु कावनिशी याने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत पाचव्या मानांकित कोरियाच्या मिन ह्युक चोचा 6-4, 6-3 असा पराभव केला. 

मुलींच्या गटात भारताच्या जेन्सी कानबर हिने जपानच्या युई कोमदाचे आव्हान 6-1, 6-4 असे मोडीत काढले. हा सामना 1तास 21मिनिटे चालला. 15 वर्षीय जेन्सीने पहिल्या सेटमध्ये सुरेख खेळ करत दुसऱ्या, चौथ्या गेममध्ये युईची सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट 6-1 असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये युईने पाचव्या गेममध्ये जेन्सीची सर्व्हिस भेदली, पण पुढच्याच गेममध्ये जेन्सीने युईची सर्व्हिस रोखली व हा सेट 6-4 असा जिंकून उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले. दुसऱ्या लढतीत भारताच्या सातव्या मानांकित दिया रमेश हिने जपानच्या माई सासाकीचा टायब्रेकमध्ये 4-6, 6-4, 7-6(1) असा पराभव केला. 

दुहेरीत उपांत्य फेरीत मुलांच्या गटात अव्वल मानांकित भारताच्या अर्णव पापरकर याने थायलंडच्या कुनानन पंताराटोर्नच्या साथीत न्यूझीलंडच्या कोडी ऍटकिन्सन व ऑस्ट्रेलियाच्या जेक डेम्बो यांचा 6-1, 6-2 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. 





निकाल: मुख्य ड्रॉ: उपांत्यपूर्व फेरी : मुले: 

अर्णव पापरकर[2] (भारत)वि.वि. सेउंग-मिन ओह(कोरिया) 6-2, 4-6, 6-4; 

तविश पाहवा(भारत) वि.वि. समर्थ संहिता (भारत) 3-6, 6-3, 6-4;  

जुनसेओ जंग(कोरिया) वि.वि.जेक डेम्बो[4](ऑस्ट्रेलिया) 6-3, 6-3; 

ह्यु कावनिशी[1](जपान) वि.वि. मिन ह्युक चो[5](कोरिया)6-4, 6-3; 


  

मुली:

मिसाकी सेकिडो(जपान) वि.वि.इवा कोरीशेवा(कझाकस्तान)2-6, 6-3, 6-4;
जेन्सी कानबर(भारत) वि.वि.युई कोमदा (जपान) 6-1, 6-4;  
सियोन सिम[4](कोरिया) वि.वि.आदिया ओमारबेक(कझाकस्तान) 1-6, 7-6(2), 6-1; 
दिया रमेश[7](भारत) वि.वि. माई सासाकी(जपान)4-6, 6-4, 7-6(1);

दुहेरी: उपांत्य फेरी: 
कुनानन पंताराटोर्न(थायलंड)/अर्णव पापरकर (भारत)[1] वि.वि.कोडी ऍटकिन्सन(न्यूझीलंड)/ जेक डेम्बो(ऑस्ट्रेलिया) [3] 6-1, 6-2; 
ह्यू कावनिशी (जपान) [2] /इटो कोमदा (जपान) वि.वि. दा कोस्टा, राफालेंटिनो अली(इंडोनेशिया)/राफेल सेवेल(ऑस्ट्रेलिया)7-5, 6-4;
  
मुली:
इवा कोरीशेवा(कझाकस्तान)/आदिया ओमरबेक(कझाकस्तान) वि.वि.अझुमा काई/नानयो वादा(जपान)6-1, 6-2; 
मिकू किटाओका(जपान)/युई कोमदा (जपान)[2] वि.वि. एमिली चेन(ऑस्ट्रेलिया)[3] /रिओ योशिदा(जपान) 7-6(3), 6-3.

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

‘हात दाखवा कॅब थांबवा’ सीईओ कॅब्स चा उपक्रम**भारतातील पहिली "हायब्रिड" टॅक्सी सेवा- आता प्रवासी आणि चालक दोघांनाही मिळणार सन्मान आणि स्वातंत्र्य**शून्य कमिशन, प्रामाणिक भाडे आणि महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य