बी अ स्पोर्ट क्रिकेट अकादमी करंडक 14 वर्षाखालील दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत शहरातून 8संघ सहभागी स्पर्धेस आज 27 एप्रिल पासून प्रारंभ
बी अ स्पोर्ट क्रिकेट अकादमी करंडक 14 वर्षाखालील दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत शहरातून 8संघ सहभागी
स्पर्धेस आज 27 एप्रिल पासून प्रारंभ
पुणे, 26 एप्रिल 2026: बी अ स्पोर्ट क्रिकेट अकादमी यांच्या वतीने आयोजित बी अ स्पोर्ट क्रिकेट अकादमी करंडक 14 वर्षाखालील दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत शहरातून 8 संघांनी आपला सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा लोहगाव येथील एकेपीसी मैदानावर 27 एप्रिल 2026 पासून रंगणार आहे.
स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना स्पर्धा संचालक उत्कर्ष अग्रवाल यांनी सांगितले की, एमसीए निमंत्रित क्रिकेट स्पर्धेच्या फॉरमॅटनुसार घेण्यात येणार असून या स्पर्धेच्या माध्यमातून 14 वर्षांखालील गटातील खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करता येणार आहे. तसेच, ही स्पर्धा लाल चेंडू व व्हाईट कपड्यांमध्ये खेळवण्यात येणार आहे.
स्पर्धेत व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी, ट्रिनिटी, गॅरी कर्स्टन क्रिकेट अकादमी, बीअ स्पोर्ट क्रिकेट अकादमी, इकोल स्पोर्ट्स फाउंडेशन, वेदिक फीट, वाकड जिमखाना, विजय क्रिकेट क्लब हे 8 संघ झुंजनार आहेत.
तसेच, ही स्पर्धा साखळी व बाद पद्धतीने खेळविण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्या, उपविजेत्या संघाला करंडक, पदक अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. याशिवाय सर्वोत्कृष्ट फलंदाज, सर्वोत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर, सामनावीर यांना आकर्षक अशी पारितोषिके देण्यात येणार असल्याचे अग्रवाल यांनी नमूद केले.
Comments
Post a Comment