वने म्हणजेच जीवनाचा श्वास” : जागतिक वन दिनी राज्यभर हरित संदेश*

*“वने म्हणजेच जीवनाचा श्वास” : जागतिक वन दिनी राज्यभर हरित संदेश* 

 *जंगल हे अन्न, पाणी, हवा आणि संस्कृती जपते - घैसास* 

 *ग्रामीण भागात वृक्षसंवर्धनाची चळवळ; सुयश चॅरिटेबल ट्रस्टचा स्तुत्य उपक्रम;* 

पुणे प्रतिनिधी - जागतिक वन दिनानिमित्त “वने ही मानवी जीवनाचा श्वास आहेत” हा संदेश देत सुयश चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने महाराष्ट्रातील विविध भागांत व्यापक वृक्षसंवर्धन उपक्रम राबविण्यात आले. ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष यशवंत घैसास, स्मिता घैसास तसेच कार्याध्यक्षा शलाका घैसास यांनी याबाबत माहिती दिली.

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जंगलांचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे सांगताना त्यांनी वाढत्या प्रदूषणामुळे आणि वृक्षतोडीमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधले. “प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन केले, तरच भविष्यातील पिढ्यांना शुद्ध हवा मिळेल,” असे आवाहन त्यांनी केले.

या उपक्रमाअंतर्गत पुणे, म्हसवाड, बीड, विंचुरवाडा, गडचिरोली आणि नंदुरबार या भागांमध्ये लावलेल्या वृक्षांचे संवर्धन करून, वृक्षारोपण, पर्यावरण आणि जंगलांचे रक्षण कसे करायचे याची मोहीम राबविण्यात आली. विशेष म्हणजे, केवळ झाडे लावण्यापुरतेच न थांबता त्यांचे संगोपन आणि जतन करण्यावरही भर देण्यात आला. स्थानिक ग्रामस्थ, स्वयंसेवक आणि पर्यावरणप्रेमी यांच्या सक्रिय सहभागामुळे हा उपक्रम प्रभावी ठरला.

या वेळी लहानमूलांमध्ये पर्यावरणाबाबत जनजागृती करण्यात आली. लहान मुलांनीही उत्साहाने सहभाग घेत “आजचे रोप उद्याचा श्वास” हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून दिला. जंगल हे अन्न, पाणी, हवा आणि संस्कृती जपते.

सुयश चॅरिटेबल ट्रस्टच्या या पुढाकारामुळे ग्रामीण भागातील वाडी, वस्ती, पाड्यांमध्ये हरित चळवळ उभी राहत असून पर्यावरण संवर्धनासाठी समाज एकत्र येण्याची गरज अधोरेखित झाली आहे. भविष्यातही अशा उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप देण्याचा निर्धार ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.


“वने हीच आपल्या जीवनाची खरी शिदोरी आहेत. झाडे फक्त सावली देत नाहीत, तर ती  पुढच्या पिढ्यांचा श्वास जपतात. म्हणूनच प्रत्येकाने एक झाड लावणे आणि त्याचे संगोपन करणे हीच खरी निसर्गसेवा आहे. वने वाचली तरच मानवजातीचे अस्तित्व सुरक्षित राहील.”


Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

‘हात दाखवा कॅब थांबवा’ सीईओ कॅब्स चा उपक्रम**भारतातील पहिली "हायब्रिड" टॅक्सी सेवा- आता प्रवासी आणि चालक दोघांनाही मिळणार सन्मान आणि स्वातंत्र्य**शून्य कमिशन, प्रामाणिक भाडे आणि महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य