शिअरफोर्स आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत बीएनसीएचा तिहेरी विजय
शिअरफोर्स आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत बीएनसीएचा तिहेरी विजय
शिअरफोर्स आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा 2026 या 16, 17 व 18 मार्च दरम्यान व्हीआयटीच्या पद्मभूषण वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (पीव्हीपीसीओए) यांच्या वतीने आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (बीएनसीए) यांनी उत्कृष्ट कामगिरी करत बास्केटबॉल, व्हॉलीबॉल आणि फुटबॉल या तिन्ही क्रीडा प्रकारांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला.
बास्केटबॉल स्पर्धेत बीएनसीए संघाने दणदणीत विजय मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत संघाला रु. 21,000/- इतके पारितोषिक प्रदान करण्यात आले. सई देशपांडे हिने ‘टॉप स्कोअरर’ म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली, तर रिया देशमुख हिला ‘बेस्ट प्लेअर’ म्हणून गौरविण्यात आले.
व्हॉलीबॉल स्पर्धेतही बीएनसीए संघाने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळवला असून संघाला रु. 21,000/- इतके पारितोषिक देण्यात आले.
फुटबॉल स्पर्धेत बीएनसीए संघाने दमदार खेळ करत विजय मिळवला असून संघाला रु. 12,000/- इतके पारितोषिक मिळाले. तसेच विशाखा शितोळे हिला ‘टॉप स्कोअरर’ म्हणून सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेत बीएनसीएच्या सर्व संघांनी एकत्रितपणे उत्कृष्ट कामगिरी करत महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले.
याप्रसंगी बीएनसीएचे प्राचार्य डॉ.अनुराग कश्यप यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि क्रीडा विभाग प्रमुख प्राध्यापक उमेश चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
---
*बीएनसीए चा बास्केटबॉल संघ :* सई देशपांडे, रिया देशमुख, सुदिक्षा अनंतरामन, दिया नायर, रमा जोशी, अनुष्का काळे, हर्षदा पाटील, संजना मांडरे, सांची केरकर, अनन्या सामनपुरे.
*बीएनसीए चा व्हॉलीबॉल संघ :* शर्वरी सागर पाटील, मनस्वी ओमप्रकाश पाटील, तृप्ती थापा, उर्वी सोनुने, गायत्री चाकोते, श्रुती कहिरे, ईशा जगडे.
*बीएनसीए चा फुटबॉल संघ :* सान्वी जितुरी, विशाखा शितोळे, समिक्षा लुनावत, खुशी पारख, तनुश्री वैद्य, सेजल बेलदरे, श्रावणी मेलिंकेरी, उर्वी पटेल, वेदश्री साधन, जान्हवी मेश्राम, कृपा फाळे, विधी मुंदडा.
Comments
Post a Comment