पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचावर रंगली ‘लावण्य व ती’ सांगीतिक मैफल
पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचावर रंगली ‘लावण्य व ती’ सांगीतिक मैफल
पुणे : लावण्य म्हणजे केवळ सौंदर्य नाही, तर तिच्याकडे लावण्य असते ते विचारांचे, कलेचे आणि बुद्धिमत्तेचे, याचाच प्रत्यय आज संगीत रसिकांनी घेतला. पूना गेस्ट हाऊसच्या स्नेह मंचावर स्त्री शक्तीचा जागर करण्यात आला. निमित्त होते महिला दिनाचे आणि ‘लावण्य व ती’ या सांगीतिक सोहळ्याचे.
पूना गेस्ट हाऊसचे संचालक डॉ. किशोर सरपोतदार यांच्या संकल्पनेतून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तर संयोजन अजित कुमठेकर यांनी केले. ॲड. अवलोकीता माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
वर्षा जांभेकर यांच्यासह माया माईणकर, अनघा एकबोटे, सीमा दिघे, नम्रता काटकर, हेमा कुलकर्णी, वरदा बडबडे, रत्ना पालवे, डॉ. अनुपमा परदेशी, सूर्या शिवरामन, स्वाती मुदगल, अनुपमा खरे, शिल्पा ढवळे मराठी, हिंदी गीते सादर केली. प्रत्येकीच्या आवाजातील वेगळी नजाकत, सुरांची जादू यांनी उपस्थितांना खिळवून ठेवले. अर्चना गोजमगुंडे यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी ज्येष्ठ सतार व हार्मोनिअमवादक गौरी शिकारपूर, ज्येष्ठ गायिका अनुराधा मराठे, डॉ. विजया पुराणिक, अश्विनी जांभेकर-पितळे, अश्विनी बेहनालकर, सुविधा नाईक, वैशाली भोई, अंजली देशपांडे, गौरी वनारसे, प्राची कुलकर्णी, शिल्पा ढवळे, ज्योती ढमाळ, रुपाली करवा, ज्योत्स्ना कुलकर्णी, दिपा परब, अर्चना कोतकर या प्रतिथयश महिलांचा जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सन्मान करण्यात आला.
अवलोकीता माने व अनुराधा मराठे यांनी मनोगत व्यक्त करताना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच गायन मैफल म्हणजे रसिकांसाठी पर्वणी असल्याचे त्या म्हणाल्या.
Comments
Post a Comment